Admin
ताज्या बातम्या

अजित पवार भाजपासोबत जाणार; अंजली दमानिया यांचं ट्विट व्हायरल

राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक मोठा दावा करत ट्विट केलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक मोठा दावा करत ट्विट केलं आहे. त्यांचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे. या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाले आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या की, आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच. बघू…..आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची, असं त्या म्हणाल्या.

याच्याआधीसुद्धा त्यांनी असेच एक ट्विट केलं होते. ज्यामध्ये त्यांनी फडणवीस आणि अजितदादांच्या शपथविधीचा फोटो पोस्ट केला होता. त्यावर, किळसवाणी राजकारण… मी पुन्हा येईन, असे लिहिले होते. याच्यावरुन आता राज्याच्या राजकारणात पुन्हा महाभूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय