ताज्या बातम्या

Anjali Damania : पुणे जमीन घोटाळा प्रकरणात अंजली दमानिया थेट जाणार हायकोर्टात

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी राज्यामध्ये एकीकडे सुरु आहे. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांमध्ये वाद-विवाद सुरु आहे. महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये नाराजीनाट्य सुरु आहे.

Published by : Varsha Bhasmare

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी राज्यामध्ये एकीकडे सुरु आहे. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांमध्ये वाद-विवाद सुरु आहे. महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये नाराजीनाट्य सुरु आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राजीनाम्याची मागणीसामाजिक कार्यकर्त्या यांनी केली आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीच्या नावाने जमीन घोटाळा समोर आल्यानंतर दमानियांच्या निशाण्यावर अजित पवार आले आहेत. यानंतर अजित पवारांचे चॅलेंज आता अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी स्वीकारले.

कोरेगाव पार्क येथील जमीनीच्या घोटाळा प्रकरणामुळे अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती. तसेच जोरदार टीका झाल्यानंतर हा व्यवहार रद्द करण्यात आला. मात्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक पुरावे सादर केल्यानंतर अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र यावर अजित पवार यांनी सज्जड पुरावे असतील तर हायकोर्टामध्ये जा, असे म्हणत थेट चॅलेंज दिले. अंजली दमानिया यांनी हे चॅलेंज स्वीकारले आहे. त्यामुळे आता पुण्यातील जमीन घोटाळ्याचे प्रकरण हे थेट हायकोर्टामध्ये जाणार आहे.

काय म्हणाल्या अंजली दमानिया?

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या की, मुंढवा जमीन घोटाळा हा सरळसरळ “ओपन अँड शट केस” असून संपूर्ण व्यवहार खोट्या कागदपत्रांवर आधारित असल्याचा आरोप मी पुन्हा करीत आहे. एलओआय, सेल डीड, ताबा प्रक्रिया—सर्व काही खोटे होते, आणि या प्रकरणात कलेक्टर ते पालकमंत्रीपर्यंत सहभाग होता, अशी माझी ठाम भूमिका आहे. पार्क कंपनीने हा व्यवहार केला असला तरी त्यांना राजकीय संरक्षण मिळाले, आणि त्यामुळेच हे घोटाळे निर्भयपणे घडला असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, “मी पुढील आठ दिवसांत हायकोर्टात याचिका दाखल करणार असून, कोणत्याही सरकारला चौकशी थांबवण्याचा अधिकार नसल्याचे आणि तो फक्त न्यायालयाकडे असावा, ही मागणी करणार आहे. सिंचन घोटाळ्यासारखीच ही लढाई मी शांतपणे पण ठामपणे लढवणार आहे. भ्रष्टाचाराविरोधात बोलणाऱ्या पक्षांचेच कार्यकर्ते खंडणी, धमक्या आणि गुंडगिरीची भाषा वापरत असतील, तर त्यांच्याकडून वेगळ्या संस्कारांची अपेक्षा नाही. तसेच पैशांचे वाटप निवडणुकांतील हे लोकशाहीला घातक असून, काही राजकीय नेत्यांनी या प्रकरणातही नैतिक जबाबदारी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा