अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी केवळ महायुतीच्यावतीने बनसोडे यांचा अर्ज आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा बनसोडे यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुमोदन दिले. मुख्यमंत्र्यांनी मांडलेला प्रस्ताव एकमताने संमत करण्यात आला.