Anna Hazare Anna Hazare
ताज्या बातम्या

Anna Hazare : Big Breaking! अण्णा हजारे बसणार पुन्हा उपोषणाला; मुख्यमंत्र्यांना दिले पत्र

एक मोठी बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

Published by : Riddhi Vanne

(Anna Hazare) एक मोठी बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून, 30 जानेवारीपासून उपोषण सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे.

अण्णा हजारे यांनी पत्रात म्हटलं आहे की, ते लोकायुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी उपोषण करणार आहेत. 28 डिसेंबर 2022 मध्ये विधानसभेत आणि 15 डिसेंबर 2023 मध्ये विधानपरिषदेत विधेयक मंजूर झालं, पण त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही. यामुळे अण्णा हजारे यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि आगामी ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

अण्णा हजारे यांच्या या उपोषणाच्या इशाऱ्यामुळे सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे, पण त्याची अंमलबजावणी करण्यात सरकारने नकार दिला आहे, असे अण्णा हजारे यांनी पत्रात म्हटलं आहे. यामुळे सरकारला तातडीने या मागणीवर निर्णय घेणे आवश्यक आहे. अण्णा हजारे यांच्या उपोषणामुळे सरकारवर दबाव वाढणार आहे, आणि आता सरकार या पत्रावर काय निर्णय घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

थोडक्यात

  • (Anna Hazare) एक मोठी बातमी समोर येत आहे.

  • ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

  • त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून, 30 जानेवारीपासून उपोषण सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा