गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरू असलेल्या देशातील टोल नाक्याच्या मुद्द्यावर मार्ग काढण्यात आला आहे. प्रस्तावित नवीन टोल धोरणामुळे टोल शुल्कात सरासरी 50 टक्के सवलतीसह लोकांना तीन हजार रुपये वार्षिक पासची सुविधा उपलब्ध होणार आहे. हे पास राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती महामार्ग तसेच राज्य द्रुतगती महामार्गावर लागू होणार आहेत. यासाठी वेगळा पास घेण्याची आवश्यकता नाही, तर फी फक्त फास्टॅग खात्याद्वारे भरता येणार आहे.
नवीन टोल धोरण टोल प्लाझावरील व्यवस्थेऐवजी प्रति किलोमीटर निश्चित शुल्कावर आधारित असेल. साधारणपणे एका गाडीला प्रत्येक शंभर किलोमीटरसाठी 50 रुपये टोल शुल्क द्यावे लागेल. नवीन टोल धोरण तयार करण्याशी संबंधित सध्या फक्त मासिक पास दिले जातात. त्यानुसार, स्थानिक लोकांना टोल प्लाझा ओलांडण्यात दिलासा दिला जातो. पंरतू नवीन धोरणात, 3 हजार रुपयांचा वार्षिक पास मिळवून एक कार वर्षभर अमर्यादित किलोमीटर प्रवास करू शकते. तसेच कोणत्याही एक्सप्रेसवे किंवा महामार्गावर त्याला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
नवीन टोल धोरण तयार करताना सल्लागारांनी मंत्रालयांना बँकांना रस्त्याच्या कडेला असलेल्या सुविधांच्या मालकीमध्ये भागभांडवल ठेवण्याची परवानगी देण्याचा सल्ला दिला आहे. दिल्ली जयपूर महामार्गापासून ते सुरू होण्याची शक्यता आहे. संपूर्ण नेटवर्क मॅप केले आहे, नवीन तंत्रज्ञान सर्व भागात सेन्सर आणि कॅमेरे बसवले जातील.