ताज्या बातम्या

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी

बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एक धमकी आल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एक धमकी आल्याची माहिती मिळत आहे. यावेळी ट्रॅफिक कंट्रोलला पाठवलेल्या संदेशात ही धमकीची माहिती लिहिण्यात आली आहे. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या जवळचे असल्याचे सांगितले.

मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर एक धमकीचा संदेश आला असून, लॉरेन्स बिश्नोईशी असलेले त्याचे दीर्घकालीन वैर संपवण्यासाठी अभिनेता सलमान खानकडे 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

हा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, तो सलमान आणि लॉरेन्स गँगमध्ये समेट घडवून आणणार आहे. त्यासाठी त्याने पैसे मागितले आहेत आणि जर पैसे दिले नाहीत तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल. मुंबई पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune Swargate Accused : स्वारगेट प्रकरणातील आरोपीला दिलासा नाहीच! न्यायालयाने दुसऱ्यांदा जामीन नाकारल्याने आरोपीच्या अडचणीत वाढ

Mega Block Cancelled : मुंबईकरांना गणराया पावला! मध्य रेल्वेचा संडे मेगा ब्लॉक रद्द; मुंबई लोकल ट्रेनबाबत मोठी अपडेट

Manoj Jarange Maratha Protest : ...पोलीसही गायब, आंदोलनात रात्रीच्या वेळेस खळबळ! संशयित व्यक्तीकडून जरांगेंचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Update live : आज सकाळी 10 वाजता मराठा आरक्षण उपसमितीची बैठक