ताज्या बातम्या

Manoj Jarange Maratha Protest : मराठा आंदोलनात आणखी एका मराठा बांधवाचा गेला जीव; जरांगेंसह सर्व आंदोलकांमध्ये शोककळा आणि संतापाची लाट

मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आणखी एका युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Published by : Prachi Nate

मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आणखी एका युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विजय घोगरे (रा. टाकळगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर) या कार्यकर्त्याला हृदयविकाराचा झटका आला. तातडीने जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यापूर्वी दोन दिवसांपूर्वीच जुन्नरजवळील आंदोलनात सहभागी झालेल्या एका बांधवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनासाठी राज्यभरातून हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल होत आहेत. रेल्वे, खासगी गाड्या किंवा मिळेल त्या वाहनाने लोक राजधानीत पोहोचत आहेत. मात्र, निवास आणि भोजनाची पुरेशी सोय नसल्याने आंदोलकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या सलग मृत्यूंमुळे समाजात तीव्र हळहळ व्यक्त होत असून वातावरण अधिक तापले आहे.

मुंबईतील सीएसएमटी परिसरात घडलेल्या या घटनेनंतर जरांगे पाटलांनी सरकारवर गंभीर आरोप केले. “आमच्या आंदोलनात दोन कार्यकर्त्यांचे बळी गेले आहेत. ही शोकांतिका सरकारकडून दुर्लक्षाचे परिणाम आहेत,” असे ते म्हणाले. तसेच, आगामी शनिवार-रविवारी मुंबईत मराठा बांधवांचा जनसागर उसळेल, असा इशारा त्यांनी दिला.

सध्या मुंबईत आंदोलनाचा दुसरा दिवस सुरू असून हजारो कार्यकर्ते शांततेच्या मार्गाने लढा देत आहेत. उपोषणकर्ते जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असून, मृत्यूंसारख्या दुर्दैवी घटनांनंतरही कार्यकर्त्यांचा उत्साह आणि निश्चय कमी झालेला नाही. उलट, या घटनेमुळे आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा