दहावी परीक्षेचा निकाल 13 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला होता. बीडमधील आष्टी शहरातील दत्त मंदिर परिसरातील अनुष्का व तनुष्का धिरज देशपांडे या जुळ्या बहिणींना सारखे गुण मिळाले आहे. दोघींनाही 96 टक्के गुण मिळाल्याने या जुळ्या बहिणींची आणि मार्कांची खूपच चर्चा होत आहे. परिसरात जुळ्या बहिणींना जुळे गुण मिळाले अशी चर्चा होत आहे.