Pigeon Feeding  
ताज्या बातम्या

Pigeon Feeding : नियंत्रित पद्धतीने कबुतरांना खाद्य देण्यासाठी तीन संस्थांनाचे अर्ज

दादरमधील कबुतरखान्यावरून सुरु असलेला वाद अजूनही थांबलेला नाही.

Published by : Team Lokshahi

( Pigeon Feeding) दादरमधील कबुतरखान्यावरून सुरु असलेला वाद अजूनही थांबलेला नाही. नियंत्रित पद्धतीने कबुतरांना खाद्य पुरवण्याबाबत मुंबई महानगरपालिकेकडे 3 वेगवेगळ्या संस्थांचे अर्ज आले आहेत. यामध्ये दादर कबुतरखाना ट्रस्ट बोर्ड, यास्मिन भन्साळी अँड कंपनी तसेच प्राणी-पक्षी हक्क कार्यकर्त्या पल्लवी पाटील यांचा समावेश आहे.

या तिन्ही अर्जांवर नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. अंतिम मुदत 29 ऑगस्ट 2025 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार हे अर्ज महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर पाहता येतील. इच्छुक नागरिकांनी आपल्या हरकती अथवा सूचना ई-मेलद्वारे किंवा लेखी स्वरूपात परळ येथील एफ-दक्षिण विभाग कार्यालयात सादर कराव्यात.

दादर कबुतरखाना ट्रस्टने सादर केलेल्या प्रस्तावानुसार कबुतरांना दिवसातून 3 वेळा – सकाळी 7 ते 9, दुपारी 12 ते 1 आणि संध्याकाळी 4 ते 5 या वेळेतच धान्य देण्याची तयारी दर्शवली आहे. धान्य स्वच्छ व कोरडेच असावे, अतिरिक्त अन्न उरू नये, तसेच परिसराची स्वच्छता व निर्जंतुकीकरण त्वरित करण्यात येईल, असे आश्वासनही ट्रस्टने दिले आहे. अनधिकृत लोकांना अन्नदान थांबवण्यासाठी कुंपण व सूचना फलक लावले जातील, असेही अर्जात नमूद आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना खाद्य देण्यावरील बंदी कायम ठेवली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Indians New Name : मुंबई इंडियन्स संघाबाबत मोठा निर्णय; संघाचे नाव बदलून नवं नाव ठेवणार, 'एमआय...'

Sara Tendulkar : सारा तेंडुलकरने सुरू केली नवी इनिंग! सचिन तेंडुलकरने स्पेशल पोस्टसह दिली माहिती

Swanandi Berde Laxmikant Berde's Daughter : लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक आता व्यावसायिका; 'या' ज्वेलरी ब्रँडची घोषणा

Bail Pola Festival : राज्यात बैलपोळ्याचा उत्सव साजरा, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण