cabinet distributions 
ताज्या बातम्या

पुन्हा मंत्री झालेल्यांना जुनी खाती मिळण्यात अडचणी?

पुन्हा मंत्री झालेल्यांना जुनी खाती मिळण्यात अडचणी येणार असल्याच्या चर्चा आहेत. मित्रपक्षांमुळे अन्य खात्यांवर समाधान मानावे लागणार आहे. 5 प्रमुख खात्यांसाठी अनेक दावेदार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Published by : Team Lokshahi

राज्यात महायुती सरकार स्थापन झालं आहे. आमदारांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता खातेवाटपावरून खलबतं सुरू आहेत. पुन्हा मंत्री झालेल्यांना जुनी खाती मिळण्यात अडचणी येत असल्याची सूत्रांनी लोकशाही मराठीला माहिती दिली आहे. मित्रपक्षांमुळे अन्य खात्यांवर समाधान मानावे लागणार आहे. 5 प्रमुख खात्यांसाठी अनेक दावेदार असल्याचं समोर आलं आहे. कॅबिनेट मंत्र्यांची संख्या मुख्यमंत्र्यांसह ३६ इतकी आहे. बहुतेक मंत्र्यांकडे एकेकच खाती असतील.

पूर्वीची खाती मिळण्यात अडचणी काय आहेत?

देवेंद्र फडणवीस यांच्या २०१४ च्या सरकारमध्ये किंवा शिंदे सरकारमध्ये मंत्री असलेल्या काही जणांना त्यांची पूर्वीची खाती पुन्हा मिळण्याची शक्यता कमी आहे. मंत्र्यांची संख्या अधिक असणे, पूर्वीची खाती मित्रपक्षांकडे गेलेली आहेत अशी स्थिती असल्याने आधीच्या आवडत्या खात्यांना त्यांना मुकावे लागू शकते.

अर्थ अजित पवारांकडे, नगरविकास शिंदेंकडे, गृह फडणवीसांकडे?

नगरविकास खाते हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तर वित्त खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच राहणार आहे. गृहखाते हे स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

प्रमुख खात्यांसाठी कोणाची नावं चर्चेत?

महसूल, ग्रामविकास, ऊर्जा, जलसंपदा, गृहनिर्माण या 5 प्रमुख खात्यांसाठी चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे आणि अतुल सावे हे प्रमुख दावेदार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. अर्थातच, सातपैकी पाच जणांना प्रत्येकी एक या प्रमाणे ही खाती मिळतील. तर दोघांना त्यापेक्षा कमी महत्त्वाची खाती दिली जातील अशी चर्चा आहे.

कोणाला कोणतं खातं मिळण्याची शक्यता?

पंकजा मुंडे यांना कोणतं खातं मिळणार?

  • पंकजा मुंडे या २०१४ ते २०१९ ग्रामविकास व महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री होत्या. आता महिला व बालकल्याण विभाग हा अजित पवार गटाकडे आहे. या पक्षाच्या एकमेव महिला मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे हे खाते जाईल, असे जवळपास निश्चित असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शिंदे सरकारमध्ये ग्रामविकास खाते हे गिरीश महाजन यांच्याकडे होते. यावेळीही ते त्यांच्याकडेच राहिले तर पंकजा यांच्याकडे वेगळे खाते जाईल. महाजन यांच्याकडे जलसंपदा वा ऊर्जा खाते दिले गेले तर मात्र पंकजा यांना ग्रामविकास खाते मिळू शकेल.

    बावनकुळे यांना कोणतं खातं मिळणार?

  • भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल खाते दिलं जाऊ शकतं. आता मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनंतर वरिष्ठ मंत्री झाले आहेत. विधानसभेत सोमवारी ते या तिघांनंतर चौथ्या बाकावर होते. बावनकुळेंनी आवडीचे ऊर्जा खाते मिळावे असा आग्रह त्यांनी धरला तर ते देताना त्यांना त्यापेक्षा कमी महत्त्वाचे एखादे खाते दिले जाऊ शकते.

  • आधीच्या फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा व उत्पादन शुल्क ही खाती होती. आता उत्पादन शुल्क हे शिंदेसेनेकडे आहे. अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास खाते जाईल. आशिष शेलार हे २०१९ मध्ये शालेय शिक्षणमंत्री होते पण आता हे खाते शिंदेसेनेकडे आहे.

  • शिंदेसेनेमध्ये भरत गोगावले २ यांच्याकडे परिवहन, प्रकाश आबिटकर आणि प्रताप सरनाईक यांच्याकडे शालेय शिक्षण वा सार्वजनिक आरोग्य यापैकी एक, शंभूराज देसाई यांच्याकडे उत्पादन शुल्क, गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा, उदय सामंत यांच्याकडे उद्योग, संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय अशी खाती राहण्याची शक्यता आहे.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला चंदनापुरी घाटात अपघात, विद्यार्थी जखमी

Disha Salian Case: 'उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी...'; ठाकरे गटाचा पुन्हा हल्लाबोल म्हणाले...

SEBI Highest Penalty : SEBI नं जेन स्ट्रीट ग्रुपला 4,843 कोटी रुपयांचा दंड ठोठावला