लाकडी चॉपिंग बोर्ड बहुतेक स्वयंपाकघरांमध्ये एक महत्त्वाचा भाग असतात. आजकाल अनेक किचनमध्ये हे चॉपिंग बोर्ड सर्रास वापरले जातात. मात्र. त्याची योग्य प्रकारे काळजी घेतली गेली नाही तर हे आपल्या कुटुंबाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतं.
अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबईच्या वरिष्ठ क्लिनिकल आहारतज्ञ वर्षा गोरे यांनी सांगितले की, लाकूड स्वभावानेच सच्छिद्र (पॉरस) असते, ज्यामुळे ते त्यावर कापलेले पदार्थ, जसे ताजे टोमॅटोचे रस, कच्च्या चिकनचे अवशेष, किंवा आले-लसूण, भाज्यांमधील रस सहजपणे शोषून घेतो. यामुळे लाकडी बोर्डावर बॅक्टेरिया आणि बुरशीच्या वाढीसाठी एक प्रकारचे पोषक वातावरण तयार होतं. ज्यावर बॅक्टेरिया आणि बुरशीच्या वाढ होऊ शकते.
विशेषत: भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशांमध्ये, जिथे आर्द्रतेचे प्रमाण वर्षभर जास्त असतं. ही आर्द्रता बॅक्टेरिया आणि बुरशीच्या वाढीस चालना देण्यास अनुकूल असते. गोरे म्हणाल्या की, “नियमित वापरामुळे लाकडी चॉपिंग बोर्डच्या पृष्ठभागावर लहान खोबणी आणि ओरखडे पडतात. यामध्ये अन्नाचे अवशेष अडकून राहतात, ज्यामुळे त्यांची स्वच्छ करणे कठीण होतं. यामुळे रोगजनक, जसे की साल्मोनेला, ई. कोली आणि लिस्टेरिया, बोर्डावर राहून अन्न दूषित करू शकतात.” अशा दूषित अन्नामुळे अन्नजन्य आजारांचा धोका वाढतो, जे काही वेळा गंभीर आणि जीवनघातक होऊ शकतात.
कशी घ्याल लाकडी चॉपिंग बोर्डची काळजी?
सतत स्वच्छता: लाकडी बोर्डला योग्य प्रकारे धुवा आणि निर्जंतुक करा. लिंबू, व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा यासारख्या पदार्थांचा वापर करा.
तेल लावणे: लाकडी बोर्डाचे संरक्षण करण्यासाठी नियमितपणे तेल लावा.
उपयोगानंतर धुवा: चिकन, मासे किंवा इतर कच्च्या पदार्थांनंतर लगेचच बोर्ड धुवावा आणि स्वच्छ केला पाहिजे.
पर्यायी चॉपिंग बोर्ड: अॅक्रेलिक, स्टील, रेसिन बोर्डाचा वापर करावा.