ताज्या बातम्या

20 कोटी सापडलेल्या आर्पिताच्या त्या 40 पानांच्या डायरीत आहे काय ?

ईडीने सोमवारी कोलकाता उच्च न्यायालयासमोर अनेक गोष्टी ठेवल्या आहेत. यातील सर्वात महत्त्वाची ब्लॅक डायरी आहे

Published by : Team Lokshahi

सरकारी शाळांमधील कथित भरती घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगालचे मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता चटर्जी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुमारे अटक केली होती. ईडीने सोमवारी कोलकाता उच्च न्यायालयासमोर अनेक गोष्टी ठेवल्या आहेत. यातील सर्वात महत्त्वाची ब्लॅक डायरी आहे, जी अर्पिता मुखर्जीच्या घरातून तपास यंत्रणेने जप्त केली आहे.

बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात अटक झालेला पार्थ चॅटर्जी मंगळवारी कोलकाता परतला. एम्स भुवनेश्वरचा आरोग्य अहवाल कलकत्ता उच्च न्यायालयात सादर केलाल. कोला. कोलकोत्यातही डॉक्टरांनी वैद्यकीय अहवालाच्या आधारे त्याला दाखल करण्यास नकार दिला आहे. पार्थचे वैद्यकीय अहवाल चांगला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले.

ब्लॅक डायरीमध्ये काय पुरावे?

  • अहवालात ईडीच्या हवाल्याने म्हटले आहे की 40 पानांच्या डायरीमध्ये शिक्षक घोटाळ्याशी संबंधित नोंदी आहेत. ईडीने सांगितले की, 40 पैकी 16 पानांमध्ये पैशाच्या अवैध व्यवहारांचा उल्लेख आहे.

  • उच्च शिक्षण विभागाचा एक पॉकीट सापडले आहे. त्यात पाच लाखांची रोकड होती.

  • दोन कंपन्यांच्या हस्तांतरणाची कागदपत्रेही सापडली आहेत. घोटाळ्याचा पैसा या कंपन्यांच्या माध्यमातून हस्तांतरित करण्यात आल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

  • पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी सतत संपर्कात असल्याचे डायरीतून दिसत आहे.

  • ग्रुप डी कर्मचाऱ्यांची प्रवेशपत्रेही सापडली असून, त्यावरून पार्थचा या घोटाळ्यात महत्त्वाचा सहभाग असल्याचे दिसून येते.

ममतांनी पार्थचे फोनही घेतले नाहीत

पार्थ चॅटर्जीला अटक झाल्यावर त्याने ममता बॅनर्जींना तीनदा फोन केला. ममताने तिचा फोन घेतले नाही. तसेच सोमवारी पहिल्यांदाच आपले मौत तोडत ममता म्हणाली- "कोणी चूक केली असेल, तर त्याला शिक्षा मिळाली पाहिजे. अशा लोकांना आम्ही पाठिंबा देणार नाही. परंतु सत्याच्या आधारे निकाल दिला गेला पाहिजे."

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू