थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Goa Night Club Fire) गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये शनिवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या घटनेत 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी असून जखमींना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी आता गोवा सरकारकडून 3 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आले आहे. गंभीर निष्काळजीपणाबद्दल थेट पंचायत संचालक सिद्धी हळणरकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पूर्वीच्या सचिव शर्मिला मोंतेरो आणि हडफडे पंचायत सचिव रघुवीर बागकर या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
बेकायदेशीर बांधकामाला परवानगी आणि प्रशासकीय स्तरावर झालेल्या गंभीर दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर येत असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
गोवा सरकारकडून 3 अधिकाऱ्यांचं निलंबन
पंचायत संचालक,प्रदूषण नियंत्रण,हडफडे पंचायत सचिवांचं निलंबन
प्रशासकीय स्तरावर झालेल्या दुर्लक्षामुळे दुर्घटना झाल्याचा आरोप