पंजाबमध्ये तीन वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रस्ता अडवण्यात आला होता. या प्रकरणी आता शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचे उल्लंघन केल्याप्रकरणी 25 शेतकऱ्यांविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. 5 जानेवारी 2022 रोजी पंजाबमधील फिरोजपूरच्या दौऱ्यावर होते तेव्हा त्यांच्या सुरक्षेचे उल्लंघन झाले होते..त्यात भारतीय किसान युनियन आणि क्रांतिकारी पेंडू मजदूर युनियनचे 25 सदस्य आहेत.