ताज्या बातम्या

चंद्र मोहिमेवर आर्टेमिस-१ ने पृथ्वीचे नेत्रदीपक छायाचित्र टिपले, नासाने शेअर केला व्हिडिओ

अमेरिकन अंतराळ संस्था नासाने चंद्रावर जाण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

अमेरिकन अंतराळ संस्था नासाने चंद्रावर जाण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले आहेत. याला मिशन मून असे नाव देण्यात आले असून त्याचा उद्देश चंद्रावरील जीवनाचा शोध घेणे हा आहे. आता 50 वर्षांनंतर नासाने आर्टेमिस-1 मोहीम सुरू केली आहे. जे मिशन मूनमध्ये अमेरिकेचे मोठे पाऊल आहे. आर्टेमिस-1 मोहिमेचे फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. आता या रॉकेटचा एक व्हिडिओ नासाने शेअर केला आहे. ज्यामध्ये आपला ग्रह म्हणजेच पृथ्वी दिसतो. या मिशनच्या नावाने नासाने आपले ट्विटर हँडल तयार केले आहे. नासा आर्टेमिस नावाच्या या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये पृथ्वीची प्रेक्षणीय छायाचित्रे टिपण्यात आली आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना नासाने लिहिले की, मिशन मूनच्या दिशेने जाणाऱ्या यानाने आपल्या ग्रहाची ही अद्भुत छायाचित्रे टिपली आहेत. रॉकेटच्या मागे पृथ्वी दिसत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

वास्तविक, या संपूर्ण प्रक्रियेचा उद्देश मानवाला पुन्हा एकदा चंद्राच्या भूमीवर उतरवण्याचा आहे. आर्टेमिस-1 ची रचना अशाच प्रकारे करण्यात आली आहे. यामध्ये मानवासारखे दिसणारे पुतळे पाठवण्यात आले आहेत. जर सर्व काही सुरळीत झाले, तर पुढच्या टप्प्यात मानव या अंतराळ यानात बसतील आणि पुन्हा एकदा चंद्राच्या भूमीवर पावले टाकली जातील. हे जगातील पहिले अंतराळयान आहे जे सुमारे 4.50 लाख किमी अंतर कापेल. या अंतराळयानाद्वारे नासा चंद्रावर राहण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बारकावे तपासणार आहे. यासोबतच हे देखील पाहिले जाईल की जर एखादी व्यक्ती चंद्रावर उतरली तर तो तिथे किती काळ थांबेल आणि तो सुखरूप परत कसा येईल.

नासाच्या म्हणण्यानुसार, जर सर्व काही ठीक झाले तर 2024 च्या अखेरीस किंवा 2025 पर्यंत अंतराळवीरांची एक टीम चंद्रावर जाईल. विशेष बाब म्हणजे आर्टेमिस-1 चंद्र मोहिमेदरम्यान ओरियन आणि एसएलएस रॉकेट चंद्रावर प्रवास केल्यानंतर पृथ्वीवर परततील. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्राशिवाय मंगळ आणि इतर ग्रहांवरही प्रवेश करणे सोपे होईल. सध्या आर्टेमिस-१ चे यशस्वी प्रक्षेपण अत्यंत खास मानले जात आहे. हे मिशन पूर्ण होण्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : नागपुरात आज राष्ट्रवादीचं चिंतन शिबीर

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकन संसदेबाहेर उभारला 12 फुटी पुतळा

Neeraj Chopra : जागतिक स्पर्धेत नीरज आठव्या स्थानी; तर सचिन यादवची लक्षवेधी कामगिरी

Uttarakhand landslide : उत्तराखंडमध्ये भूस्खलनात दोघांचा मृत्यू; सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती