आम आदमी पार्टीचे नेता आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता केजरीवाल लग्नबंधनात अडकली आहे. हर्षिताने तिचा कॉलेजचा मित्र संभव जैनसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो समाज माध्यमांवर शेअर करण्यात आले आहेत. अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नात पांढरी शेरवानी घातली होती. तर सुनीता केजरीवाल लाल साडीत दिसत आहेत. सर्वात उजवीकडे असलेला मुलगा पुलकित देखील शेरवानीमध्ये दिसत आहे.
अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता केजरीवालच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये अरविंद केजरीवाल, त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल, मुलगी हर्षिता, मुलगा पुलकित केजरीवाल, संभव जैन आणि त्यांचे कुटुंब दिसत आहे. वधू-वरांनी लग्न समारंभात उपस्थित असलेल्या लोकांचे हात जोडून स्वागत केले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. संभव जैन आणि हर्षिताने आयआयटी दिल्लीत एकत्र शिक्षण घेतले आहे. दोघांनी काही दिवसांपूर्वी एकत्र एक स्टार्टअप सुरू केला होता.
गुरुवारी, १७ एप्रिल रोजी हर्षिता आणि संभव यांचा साखरपुडा आणि इतर विधी पार पडले. अरविंद केजरीवाल आणि त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यात गाण्यावर नाचताना दिसले. या कार्यक्रमात खूप कमी पाहुणे उपस्थित होते. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यात भाग घेतला.