राज्यात राजकीयवर्तुळात मोठा भूकंप येणार असल्याच्या चर्चा सुरु असताना, आता शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यादरम्यान शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. आमची माणस फुटणार अशी मुद्दम ठिणगी पेटवली गेली, पण आमची वज्रमूठ आहे टायगर अभी जिंदा है असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे.
अरविंद सावंत म्हणाले की, सकाळपासून अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. मुळात ज्यांच्यामध्ये एकमत नाही, ज्यांची स्वतःच्या पायाखालची वाळू सरकली आहे, सुसंवाद नाही, सरकारमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं येऊन सुद्धा त्यांच्याच रोज नवीन बातम्या आहेत. अनेक मंत्री गटाकड्या खात आहेत. अशावेळेला या सगळ्या बातम्या सातत्याने येत असताना, कुठे तरी त्यांच्यावर दुर्लक्ष करायला लावायचं म्हणून कुणी तरी हा मुद्दाम केलेला डाव आहे.
म्हणून, आम्ही आज एकत्र सगळे आलो आणि हे दाखवण्यासाठी आलो की आमची वज्रमूठ आहे, टायगर अभी जिंदा है... उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलेलं नाही. आमचं हिंदुत्व हे ढोंगी नाही. आमचं हिंदुत्व या राष्ट्रासाठी आहे, जो या राष्ट्रासाठी आपलं प्राण पण पणाला लावू शकतो तो आमच्यासाठी हिंदू आहे.. भाजपला फक्त सत्ता हवी, हिंदुत्व महत्वाचं नाही...