Arvind Sawant, Sharad Pawar Team Lokshahi
ताज्या बातम्या

रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करायचं का? शरद पवारांचं नाव घेत अरविंद सावंतांचा मोठा गौप्यस्फोट

महाविकासआघाडी सरकारच्या स्थापनेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या एका विधानाबाबत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला

Published by : shweta walge

महाविकासआघाडी सरकारच्या स्थापनेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या एका विधानाबाबत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री राहिलेले दिग्गज नेते आहेत. त्यांनी रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करायचं का? असा प्रश्न शरद पवारांनी विचारल्याचं अरविंद सावंत यांनी सांगितल आहे.

काय म्हणाले अरविंद सावंत?

शरद पवार म्हणाले होते की, काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण असे दोन दोन मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार यांच्यासारखे दिग्गज नेते आहेत. ते या रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का?”

असं असूनही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंचं नाव दिलं होतं. यानंतर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना गळ घातली. हे शिवधनुष्य उद्धव ठाकरेंनाच घ्यावं लागेल असं शरद पवार म्हणाल्याचे अरविंद सावंत यांनी सांगितलं.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये काल महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. सभेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली. देशभरातली भ्रष्ट माणसं या भाजपात आहेत. आणि नाव भाजपा आहे. जर भारतीय जनता पक्ष म्हणून तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेत असाल, तर पक्षाचं नाव बदलून भ्रष्ट जनता पार्टी असं ठेवा. अस उद्धव ठाकरे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप