DevendraFadnavis 
ताज्या बातम्या

Devendra fadnavis : 'तुमचा देवाभाऊ जोपर्यंत मुख्यमंत्री, तोपर्यंत…'; फडणवीसांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

पाथरडी येथे झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरी विकासावर भर दिला आणि लाडकी बहीण योजनेबाबत महत्वपूर्ण घोषणा केली.

Published by : Varsha Bhasmare

पाथरडी येथे झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरी विकासावर भर दिला आणि लाडकी बहीण योजनेबाबत महत्वपूर्ण घोषणा केली. फडणवीस यांनी पाथरडी नगरपालिकेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शहराला भेट दिली. यावेळी त्यांनी नमूद केले की, स्वातंत्र्यानंतर अनेक दशके गावांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले, परंतु शहरांकडे दुर्लक्ष झाले. स्मार्ट सिटी, अमृत, प्रधानमंत्री आवास योजना शहरी, हर घर जल शहरी आणि स्वच्छ भारत योजना 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली शहरांसाठी शहरी यांसारख्या विविध योजना सुरू करण्यात आल्या.

फडणवीस यांनी महाराष्ट्रात 30 लाखांहून अधिक घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दिल्याची माहिती दिली. तसेच, मालकी हक्क देण्याच्या सरकारच्या निर्णयावररहिवासी अतिक्रमणे नियमित करून त्यांना प्रकाश टाकला. पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी हर घर जल योजनेद्वारे प्रत्येक घरात स्वच्छ पाणी पोहोचवण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्यातून खत आणि ऊर्जा निर्मिती, तसेच 220 कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेसारख्या प्रकल्पांवरही त्यांनी भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत देवाभाऊ तुमचा मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना तोपर्यंत कोणीच बंद करू शकत नाही, ती सुरूच राहील. भारतीय जनता पक्ष आणि युतीच्या उमेदवारांना त्यांनी मतदारांना निवडून देण्याचे आवाहन केले, जेणेकरून शहराच्या विकासाचे ध्येय साध्य करता येईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा