ताज्या बातम्या

Google Buyout: अनेक विभागांतील बदलासाठी, Google च्या कर्मचाऱ्यांसाठी VRS योजना

गुगल VRS योजना: सुधारात्मक बदलांसाठी कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती ऑफर, अनेक विभागांतील तयारी.

Published by : Team Lokshahi

गुगलने आपल्या दीर्घकालीन धोरणांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी सुधारात्मक बदल सुरू केली असून, 10 जून रोजी कंपनीने अनेक विभागांतील कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती (Buyout) ऑफर Offer केली आहे. ही योजना "नॉलेज अँड इन्फॉर्मेशन Knowledge and Information" (K&I), सेंट्रल इंजिनिअरिंग Central Engineering, मार्केटिंग, रिसर्च Marketing, Research आणि कम्युनिकेशन युनिट्स Communication Units मधील कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे. बायआउट म्हणजे कंपनीकडून देण्यात येणारे एक स्वेच्छा निवृत्ती पॅकेज, ज्याद्वारे कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्याचा पर्याय दिला जातो. हे पाऊल सहसा संघटनात्मक सुधारणा, कार्यपद्धती अधिक परिणामकारक बनवणे किंवा कर्मचार्‍यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी उचलले जाते.

एका अहवालानुसार, सर्च Research आणि अ‍ॅड्स Ads विभागातील कर्मचाऱ्यांनाही अशीच ऑफर देण्यात आली आहे. मात्र, या योजनेतून नेमके किती कर्मचारी प्रभावित होतील, याबाबत स्पष्टता नाही. कंपनीने ही योजना सध्या अमेरिका स्थित कर्मचाऱ्यांसाठी लागू केली असून, कार्यालयापासून 50 मैलांच्या परिसरात राहणाऱ्यांना ऑफिसमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची अट लागू करण्यात आली आहे. गुगल हायब्रिड वर्क मॉडेल Google Hybrid Work Model द्वारे कामकाजाची पद्धत सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.

K&I युनिटमध्ये सुमारे 20,000 कर्मचारी कार्यरत आहेत. ऑक्टोबर 2024 मध्ये या युनिटमध्ये सुधारात्मक बदल करण्यात आली होती आणि त्यावेळी निक फॉक्स Nick Fox यांची पदोन्नती झाली होती. त्यांनी 10 जून रोजी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये सांगितले की, जे अपेक्षा पूर्ण करत नाहीत त्यांनी बायआउटचा विचार करावा. पण उत्साही, प्रेरित आणि उत्कृष्ट काम करणाऱ्यांनी ही ऑफर स्वीकारू नये, कारण कंपनीकडे महत्त्वाकांक्षी योजना असून त्यांची गरज आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी बेस्ट पतपेढी पराभवासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू