(Dharmendra Deol Death Fake News ) हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास जाणवल्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अतिदक्षता विभागात (ICU) व्हेंटिलेटरवर असून, वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. देव पहलाजानी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 89 वर्षीय धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत निवेदन त्यांच्या कुटुंबाकडून आलेले आहे. मात्र, काहीवेळापूर्वीच त्यांच्या मृत्यूची अफवा पसरवण्यात आली होती. दरम्यान धर्मेंद्र यांची लेक आशिया हीने सोशलमीडियावर पोस्ट टाकत त्यांच्या मृत्यूची अफवा असून त्यांची तब्येत ठीक असल्याची माहिती दिली.
धर्मेंद्र यांच्या मृत्यूची माहिती मिळताच राजकीय नेत्यांनी ट्विट टाकत त्यांनी भावपूर्ण श्रद्धाजंली वाहली होती. परंतू आशियाच्या पोस्ट नंतर त्यांनी तातडीने ती पोस्ट डिलीट करत केली. यामध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंग , शरद पवार , खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा समावेश आहे.