ताज्या बातम्या

धर्मांधता कोण पसरवतंय हे अजित डोवाल यांनी सांगावं; ओवैसींचं आव्हान

देशात काही लोक जाणीवपूर्वकरित्या धर्म आणि विचारसरणीच्या नावानं द्वेष पसरवत असल्याचं अजित डोवाल यांनी काल एका परिषदेत म्हटलं होतं.

Published by : Team Lokshahi

AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी काल एका परिषदेत केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर निशाणा साधला. जयपूरमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, धर्मांधता कोण पसरवतंय हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सांगावं. धर्मांध कोण? त्याचं नाव डोवाल (NSA Ajit Doval) यांनी सांगितलं पाहिजे. उदयपूरची घटना गेहलोत सरकारचे अपयश असल्याचा पुनरुच्चार ओवैसींनी पुन्हा एकदा केला. कन्हैया लाल टेलरने आपल्या जीवाला धोका असल्याचं कारण देत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी ते गांभीर्यानं घेतलं नाही.

एका प्रश्नाला उत्तर देताना ओवैसी म्हणाले की, मला इंद्रेश कुमार यांच्याकडून देशभक्तीचं प्रमाणपत्र नको आहे. संघाच्या शाखांमध्ये राज्यघटनेची शपथ घेतली जाते की अन्य कशाची हे इंद्रेशकुमार यांनी सांगावं. त्या शपथेमध्ये काय वाचलं जातं ते त्यांनी जनतेलाही सांगितलं पाहिजे. अजित डोभाल यांनी अलीकडेच पीएफआयसारख्या संघटना देशासाठी धोका असल्याचं म्हटलं होतं. तसंच देशात काही लोक जाणीवपूर्वकरित्या धर्म आणि विचारसरणीच्या नावानं द्वेष पसरवत असल्याचं म्हटलं होतं.

जयपूरमध्ये टॉक जर्नालिझमच्या फाइलिंग सेशनमध्ये सहभागी होण्यासाठी असदुद्दीन ओवैसी आज जयपूरला आले होते. सीपीआय नेते ए. राजा आणि विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी या अधिवेशनात प्रमुख वक्ते होते. जयपूरमधील आपल्या मुक्कामादरम्यान, ओवैसी यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत 2023 च्या विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली. ओवैसी यांनी त्यांच्या समर्थकांशीही चर्चा केली.

ओवैसी यांनी आपला पक्ष 2023 ची राजस्थान विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं आधीच जाहीर केलं आहे. अशा स्थितीत ओवैसी यांचा राजस्थान दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. राजस्थानमध्ये 11 ते 12% मुस्लिम लोकसंख्या आहे. काँग्रेसची ही पारंपारिकपणे व्होट बँक आहे, पण राजस्थानच्या राजकारणात ओवैसींच्या प्रवेशामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं समीकरण बिघडू शकतं. सुमारे दोन महिन्यांपूर्वी ओवैसी राजस्थानला गेले होते. ओवैसी दोन महिन्यांनी राजस्थानमध्ये आल्यानं ते पक्षाची संघटना उभारणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य