ताज्या बातम्या

Asaduddin Owaisi : AIMIM ला सर्वपक्षीय बैठकीला आमंत्रण नाही? असदुद्दीन ओवैसी म्हणाले...

केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात जवळपास 28 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दहशतवाद्यांकडून पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आले. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मात्र या बैठकीला सर्वपक्षीय बैठकीत पाच ते दहा खासदार असलेल्या पक्षांनाच आमंत्रण देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यावरुन आताएआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी आता केंद्र सरकारविरोधात संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, 'पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात चर्चा करण्याकरता सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. यासंदर्भात मी किरेन रिजिजू यांच्यासोबत काल रात्री संवाद साधला. ते म्हणाले की 5 ते 10 खासदार असलेल्या पक्षांनाच या बैठकीचं आमंत्रण देण्यात आले आहे. कमी सदस्य पक्षांना आमंत्रण का नाही? असे विचारल्यावर ते म्हणाले की, बैठक लांबली जाईल. त्यानंतर मी त्यांना प्रश्न केला की, आमच्यासारख्या लहान पक्षांचं काय मग? ही बैठक भाजपाची किंवा इतर कोणत्याही पक्षाची अंतर्गत बैठक नाही. ही सर्वपक्षीय बैठक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व पक्षांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी वेळ काढू शकत नाहीत का?'

यासोबतच ते पुढे म्हणाले की, 'तुमच्या पक्षालाही बहुमत नाही. 1 खासदार असलेला पक्ष असो किंवा 100 खासदार असलेला पक्ष सर्व भारतीयांनी निवडून दिलेले खासदार आहेत. सर्वांना त्या मुद्द्यांवर भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतो की सर्वपक्षीय बैठक व्हावी, संसदेतील प्रत्येक खासदारांच्या पक्षाला आमंत्रित केलं गेलं पाहिजे' असे ते म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?