Asaduddin Owaisi Team Lokshahi
ताज्या बातम्या

ज्ञानवापी प्रकरणावर ओवैसी म्हणाले, "पंतप्रधानांनी समोर येऊन सांगावं की,..."

असदुद्दीन ओवैसी यांनी 1991 च्या कायद्याचा देखील उल्लेख यावेळी केला.

Published by : Sudhir Kakde

ज्ञानवापी असो वा मथुरा, या प्रकरणांमधून मुस्लिम समाजाविषयी अविश्वासाचं वातावरण निर्माण करणं हाच हेतू असल्याची टीका असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी केली आहे. मुस्लिम समाजाबद्दल अधिक द्वेष, आपल्या हिंदू बांधवांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि यातून देशाला मागे घेऊन जाण्याचा विचार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या लोकांना कायद्याने काही फरक पडत नाही. त्यांना मुस्लिम लोकांची प्रतिष्ठा लुटायची आहे, हे लोक कायद्याची चेष्टा करत आहेत असंही ते यावेळी म्हणाले आहेत. (Asaduddin Owaisi Reaction on Gyanvapi Controversy)

असदुद्दीन ओवैसी पुढे बोलताना म्हणाले की, दुसरा फिर्यादी न्यायालयात गेला असता न्यायालयाने नकारलं होतं, त्यामुळे त्यांनी वेगळा पक्ष काढला. आता हे सर्व संघ परिवाराशी जोडलेले आहेत असा आरोपही असदुद्दीन ओवैसींनी केला. ठहे सर्व संपवून पंतप्रधानांनी सांगण्याची देशाला हे सांगण्याची वेळ आली आहे की, त्यांचं सरकार 1991 च्या कायद्याच्या पाठीशी आहे, अशा गोष्टींना आम्ही समर्थन देणार नाही, ज्यामुळे देशात आणखी फूट पडेल" अशी अपेक्षा असदुद्दीन ओवैसींनी व्यक्त केली आहे.

शाही इदगाह मशीद हटवण्यासाठी मथुरा कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. हे प्रार्थनास्थळ कायदा 1991 चे उल्लंघन आहे. मथुरा जिल्हा न्यायालयाने खटला कायम ठेवण्यायोग्य असल्याचं सांगणं हे सुद्धा उच्च न्यायालयाच्या निकालाचं उल्लंघन आहे. संसदेच्या कायद्याच्या विरोधात आहे असं AIMIM नेते असदुद्दीन ओवैसी म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा