Asaduddin Owaisi Team Lokshahi
ताज्या बातम्या

Population control : "दोन अपत्यांच्या कायद्याला आम्ही समर्थन करणार नाही"

दोन अपत्यांची मर्यादा घालणारा कायदा तयार करावा अशी मागणी करणारा एक मतप्रवाह देशात निर्माण झाला आहे.

Published by : Sudhir Kakde

Asaduddin Owais : गेल्या काही दिवसांपूर्वीच जागतिक लोकसंख्या दिवस पार पडला, त्यामुळे सध्या देशात लोकसंख्या वाढीच्या विषयावर चांगलीच चर्चा सुरु आहे. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा करण्याची मागणी करणारा एक मतप्रवाह देशात तयार झाला आहे. या दरम्यानच, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी अशा कायद्याचं समर्थन आपण करणार नसल्याचं म्हटलं आहे. दोन मुले जन्माला घालण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली अशा कायद्याचा आपण समर्थन करणार नाही. एएनआयशी बोलताना ओवैसी म्हणाले, 'चीनने केलेली चूक आपण करू नये. दोनच मुलं जन्माला घालण्याची मर्यादा असेल अशा कोणत्याही कायद्याचं समर्थन मी करणार नाही. यातून देशाला फायदा होणार नाही. याआधीही या लोकसंख्येच्या विषयावर बोलताना ओवैसींनी 'मुस्लिमांना जबाबदार धरू नये' असं म्हटलं होतं.

गर्भनिरोधक वापरणाऱ्यांमध्ये मुस्लिम समाज आघाडीवर असं ओवैसींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाला उत्तर देताना सांगितलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, "देशात कोणत्याही एका वर्गाची लोकसंख्या वाढल्यानं अराजकता निर्माण होईल, त्यामुळे लोकसंख्येचा असमतोल नसावा." ओवैसी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. ओवैसी म्हणाले होते की, 'तुमचेच आरोग्य मंत्री म्हणतात की लोकसंख्या नियंत्रणासाठी कायद्याची गरज नाही.'

ओवेसी म्हणाले- मुस्लिम भारताचे रहिवासी नाहीत का?

मुस्लिमांची लोकसंख्या झपाट्यानं वाढल्याच्या प्रश्नावर ओवैसी म्हणाले होते, 'मुस्लिम भारताचे रहिवासी नाहीत का? खरं पाहिलं तर इथले मूळ रहिवासी आदिवासी आणि द्रविडच आहेत. यूपीमध्ये, कोणताही कायदा नसताना, 2026-30 दरम्यान प्रजनन दरात घट दिसून येईल. ओवैसी यांनी गुरुवारी सांगितलं की, भारताचा प्रजनन दर सातत्यानं कमी होतोय. 2030 पर्यंत त्यात स्थिरता दिसेल. चीनची चूक आपण इथे पुन्हा करू नये.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा