काल रात्री उशिरा केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेमध्ये वक्फ सुधारणा विधेयक केले. यावेळी सभागृहात विधेयकाच्या बाजूने 288 मतं पडली तर विधेयकाच्या विरोधात 223 मतं पडली. दरम्यान हे विधेयक मुस्लिमांच्या विरोधात असल्याचे म्हटले जात आहे.
यावरुनच ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीन पक्षाचे प्रमुख तथा हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. भाषणाच्या शेवटी ओवैसी महात्मा गांधींचं उदाहरण देत म्हणाले, “ज्या पद्धतीने गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी कायद्याच्या विरोधात भूमिका घेऊन तो अन्यायकारक कायदा नाकारला होता. त्याचप्रमाणे मी देखील हे विधयक नाकारतो. हे विधेयक असंवैधानिक असून ते संसदेतच फाडून मी माझा निषेध नोंदवतो", असं म्हणत त्यांनी विधेयकाची प्रत फाडली आहे.