ताज्या बातम्या

Ashadhi Wari 2025 : संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी लाखो भक्त दरवर्षी टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि विठूनामाच्या जयघोषात पायी यात्रा करतात.

Published by : Team Lokshahi

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी लाखो भक्त दरवर्षी टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि विठूनामाच्या जयघोषात पायी यात्रा करतात. भगवा पताका फडकवत, भक्तिभावाने या वारीत महाराष्ट्राच्या विविध भागांतून संतांचा पालखी सोहळा संपन्न होत असतो. यंदा संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे प्रस्थान 18 आणि 19 जून 2025 रोजी देहू आणि आळंदी येथून होणार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (19 जून ते 4 जुलै 2025):

या पालखीचा प्रारंभ 19 जून रोजी आळंदीतून होईल. त्यानंतर ती 20 जूनला पुण्यातील भवानीपेठेत पोहोचेल. 21 जून रोजी पुण्यात मुक्काम घेतल्यानंतर 22 तारखेला सासवडच्या दिशेने मार्गक्रमण होईल. यामध्ये शिंदे छत्री येथे आरतीसाठी थांबा आणि हडपसर येथे विश्रांती घेतली जाईल. पुढे 23 जूनला सासवड, 24 जूनला जेजुरी, 25 जूनला वाल्हे, 26 जूनला लोणंद, 27 जूनला तरडगाव, 28 जूनला फलटण, 29 जूनला बरड, 30 जूनला नातेपुते, 1 जुलैला माळशिरस, 2 जुलैला वेळापूर, 3 जुलैला भंडीशेगाव आणि 4 जुलै रोजी वाखरी येथे मुक्काम असेल.

संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (18 जून ते 4 जुलै 2025):

देहू येथून 18जून रोजी प्रस्थान करून ही पालखी आकुर्डी येथे पहिल्या मुक्कामाला पोहोचेल. 20 जूनला ती नानापेठ, पुणे येथे मुक्कामी असेल आणि 21 जून रोजी निवडुंगा विठ्ठल मंदिरात दिवसभर दर्शनासाठी थांबेल. 22 जूनला लोणीकारभोर, 23 जूनला यवत, 24 जूनला वरवंड, 25 जूनला उडंबडी गवळ्याची, 26 जूनला बारमती, 27 जूनला सणसर, 28 जूनला निमगाव केतकी, 29 जूनला इंदापूर, 30 जूनला सराटी, 1 जुलैला अकलूज, 2 जुलैला बोरगाव श्रीपूर, 3जुलैला पिराची कुरोली आणि अखेर 4 जुलै रोजी वाखरी येथे पोहोचेल.

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा

Rain Alert : पुढील काही दिवस पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार...

Ramdas Kadam On Balasaheb Thackeray Death : उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा, रामदास कदमांचं खुलं आव्हान

Pomegranate Vs Beetroot : डाळिंब की बीट... शरीरात रक्त वाढवण्यासाठी काय जास्त फायदेशीर आहे?

Devendra Fadnavis : ठाकरे गटाच्या मेळाव्यावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....