जून महिना आला की सगळ्यांनाच वेध लागते ते पंढरपूरच्या वारीचे. पंढरपूरच्या वारीच्या सोहळ्याचे वेळापत्रक नुकतेच समोर आले आहे. समोर आलेल्या वेळापत्रकानुसार, 18 जून रोजी संत तुकाराम महाराजांच्या तर 19 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे देहू आणि आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पालख्यांचा हा 18 दिवसांचा प्रवास असणार आहे. या वारीमध्ये गोल रिंगण, उभे रिंगण असे खेळ वारकरी खेळतात. हरिनामाचा जयघोष करत पालखी सोहळा पंढरपूरला जाणार आहे. या वारीचे वेळापत्रक आता समोर आले आहे.
यादरम्यान आता आषाढी एकादशीनिमित्त प्रत्येक वर्षी लाखोंचा जनसागर पंढरपूरमध्ये पाहायला मिळतो. यासाठी शासन आणि प्रशासनही भाविकांच्या सेवेसाठी दरवर्षी सज्ज असतात.यंदाच्या वर्षी सुद्धा राज्य सरकारने पंढरीच्या वारीसाठी येणाऱ्या वाहनांसाठी टोलमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर एसटी ,महामंडळाने ही ज्यादाच्या एसटीची सोय केली.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा वेळापत्रक 2025 :
19 /06/2025 माऊली पालखी प्रस्थान आळंदी
20/06/2025 आळंदी ते पुणे
21/06/2025 पुणे मुक्काम
22/06/2025 पुणे ते सासवड
23/06/2025 सासवड मुक्काम
24/06/2025 सासवड ते जेजुरी
25 /06/2025 जेजुरी ते वाल्हे
26 /06/2025 वाल्हे ते लोणंद,
27/06/2025 लोणंद ते तरडगाव
28/06/2025 तरडगाव ते फलटण
29/06/2025 फलटण ते बरड
30/06/2025 बरड ते नातेपुते
बरड येथे गोल रिंगण
01/07/2025 नातेपुते ते माळशिरस
सदाशिवनगर येथे गोल रिंगण
02/07/2025 माळशिरस ते वेळापूर
खुडूस येथे गोळ रिंगण
03/07/2025 वेळापूर ते भंडी शेगाव
ठाकूर बुवा समाधी गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट सोहळा
04/07/2025 भंडी शेगाव ते वाखरी
बाजीराव विहीर येथे उभे रिंगण
05/07/2025 वाखरी ते पंढरपूर, प्रवास व पौर्णिमेपर्यंत पंढरपूर मुक्काम
वाखरी येथे गोल रिंगण
06/07/2025 देवशयनी आषाढी एकादशी
10 /07/2025 पंढरपुरातून आळंदीकडे परतीचा प्रवास
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वेळापत्रक 2025
18/ 6/ 2025 : प्रस्थान आणि इनामदार वाड्यात मुक्काम
19 / 6/ 2025 :देहू निगडी आकुर्डी प्रवास व आकुर्डी मुक्काम
20 / 6/ 2025: आकुर्डी ते पुणे नाना पेठ मुक्काम
21 / 6/ 2025 :निवडुंगा विठ्ठल मंदिर पुणे मुक्काम
22 / 6/ 2025: पुणे हडपसर लोणी काळभोर प्रवास आणि मुक्काम
23 / 6/ 2025 :लोणी काळभोर ते यवत प्रवास व मुक्काम
24 / 6/ 2025 :यवत वरवंड चौफुला प्रवास व मुक्काम
25 / 6/ 2025 : वरवंड ते उंडवडी गवळ्याची प्रवास व मुक्काम
26 / 6/ 2025 : उंडवडी गवळ्याची ते बारामती प्रवास व मुक्काम
27 / 6/ 2025 : बारामती काटेवाडी सणसर पालखीतळ मुक्काम ( काटेवाडी येथे मेंढी बकऱ्यांचे रिंगण )
28/6/ 2025 : संसर बेलवाडी, निमगाव केतकी प्रवास मुक्काम
बेलवडी येथे पहिले गोल रिंगण
29/ 6/ 2025 : निमगाव केतकी ते इंदापूर प्रवास व मुक्काम
इंदापूर येथे गोल रिंगण
30 / 6/ 2025 : इंदापूर ते सराटी पालखीतळ प्रवास आणि मुक्काम
1/ 6/ 2025 : सराटी ते अकलूज प्रवास व मुक्काम
निरास्मान आणि अकलूज येथे गोल रिंगण
2 / 6/ 2025 : अकलूज ते बोरगाव प्रवास व मुक्काम
माळीनगर येथे उभे रिंगण
3/ 6/ 2025 : बोरगाव ते पिराची कुरोली प्रवास आणि मुक्काम
4 / 6/ 2025 : पिराची कुरोली ते वाखरी पालखीतळ मुक्काम
बाजीराव विहीर येथे उभे रिंगण
5 / 6/ 2025 : वाखरी ते पंढरपूर मुक्काम
वाखरी येथे उभे रिंगण
6 / 6/ 2025 : एकादशी नगरप्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान
10 / 6/ 2025 : पंढरपुरातून देहूकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात
'आषाढी एकादशी' निमित्त मध्य रेल्वेचा मोठा निर्णय
वारकऱ्यांचा प्रवास अधिक चांगला व्हावा, यासाठी प्रशासनाने ही पुढाकार घेतला आहे. एसटी महामंडाळाच्या निर्णयानंतर आता मध्य रेल्वेने सुद्धा वारकऱ्यांच्या सोयीसाठी मराठवाडा ,कर्नाटक ,विदर्भ विभागातून आषाढी एकादशीनिमित्त 1 जुलै ते 10 जुलै या कालावधीत 80 आषाढी विशेष गाड्या चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.