Ashadhi Wari 2025 : वारीसाठी ST महामंडळाचे विशेष नियोजन; बीडमार्गे पंढरपूरकडे ८०० विशेष बसेस Ashadhi Wari 2025 : वारीसाठी ST महामंडळाचे विशेष नियोजन; बीडमार्गे पंढरपूरकडे ८०० विशेष बसेस
ताज्या बातम्या

Ashadhi Wari 2025 : वारीसाठी ST महामंडळाचे विशेष नियोजन; बीडमार्गे पंढरपूरकडे 800 विशेष बसेस

वारीसाठी विशेष बससेवा: पंढरपूरच्या दिशेने ८०० बसेस, एसटी महामंडळाचे नियोजन.

Published by : Team Lokshahi

Ashadhi Wari 2025 : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विशेष बससेवेचे नियोजन केले आहे. यंदा बीडसह पाच जिल्ह्यांतील विभागांमधून एकूण 800 बससेवा पंढरपूरकडे धावणार आहेत. 2 ते 12 जुलै दरम्यान या बसेसची वाहतूक सुरू राहणार आहे. जालना, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा आणि बीड या पाच एसटी विभागांतून ही विशेष बससेवा सुरू होणार आहे. हे सर्व मार्ग बीड जिल्ह्यातून पंढरपूरकडे जाणार असून, बीड हा महत्त्वाचा ट्रांझिट पॉईंट ठरणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिंड्यांमार्फत लाखो भाविक पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी प्रत्येक बसस्थानकावर आवश्यक सेवा-सुविधा पुरवण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

वारकऱ्यांची संख्या लक्षात घेऊन सुरुवातीला नियोजित बसेस धावणार असून, गर्दी वाढल्यास तातडीने अतिरिक्त बसेसही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट बुकिंग, वेळापत्रक व इतर माहिती स्थानकांवर तसेच ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध राहणार आहे. एसटी महामंडळाचे हे नियोजन वारकऱ्यांच्या प्रवासाला सुलभ व सुरक्षित करण्यासाठी करण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त कर्मचारी व स्वयंसेवकांची नेमणूक केली जाणार असून, मार्गांवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनासोबत समन्वय साधण्यात आला आहे.पंढरपूर यात्रेसाठी ही विशेष वाहतूक योजना वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

हेही वाचा....

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा