ताज्या बातम्या

Ashish Shelar On Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या टीकेला आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर

राज ठाकरेंच्या आरोपांवर आशिष शेलार यांचा पलटवार, सोशल मीडियावर पोस्ट करत राज ठाकरेंना धारेवर धरलं.

Published by : Prachi Nate

राज ठाकरेंवर निवडणुकीदरम्यान भूमिका बदलल्याच्या आरोपांवरून त्यांच्या मुंबईत झालेल्या सभेत सडेतोड उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या भ्रष्टाचारी नेत्यांची यादी वाचून दाखवली आहे. तसेच त्यांनी शिवसेना आणि कॉंग्रेसवर देखील हल्लाबोल केला आहे.

इतर पक्ष काही करतील ती त्यांची परिस्थिती आणि आम्ही केलं की भूमिकेत बदल, असं का? असा प्रश्न राज ठाकरेंनी त्यांच्या सभेत उपस्थित केला आहे. राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. याचपार्श्वभूमीवर मंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे.

मंत्री आशिष शेलार यांनी सोशल मीडियवर पोस्ट करत राज ठाकरेंना धारेवर धरल आहे. आशिष शेलार पोस्ट म्हणाले की, भाजपने कधीही तडजोडीचं राजकारण केलं नाही.. राज ठाकरेंचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अर्धवट माहितीच्या आधारावर आहे.

असं म्हणत मंत्री आशिष शेलार यांचा राज ठाकरेंवर पलटवार केला. आमच्यासाठी राष्ट्र प्रथम आणि त्यामुळे राष्ट्र निर्माणाच्या आधारावर आम्ही तडजोड केली नाही. भूमिका बदलल्याच्या आरोपांवरून शेलारांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : 'आता हे जातीच कार्ड खेळणार...तुम्हाला एकत्र येऊ देणार नाहीत'; राज ठाकरेंचा मराठी माणसाला सतर्क राहण्याचा इशारा

Uddhav Thackeray on Sushil Kedia : "सुशील केडिया कोण भेडिया, ती सर्व भाजपची पिलावलं", उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका

Latest Marathi News Update live : काल एक गद्दार बोलला 'जय गुजरात' - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "मराठी शिकणारे शिक्षणमंत्री इंग्रजीमध्ये शिकणारे मुख्यमंत्री..." राज ठाकरेंचा नाव न घेता टोला