भाजप नेते व मंत्री आशिष शेलार यांनी सावरकरांच्या विचारांवर ठाम भूमिका मांडत अजित पवार यांच्या पक्षावर अप्रत्यक्ष दबाव टाकला आहे. आम्ही सावरकरांच्या विचारांवर चालतो, त्यामुळे युतीत राहायचे असेल तर ते विचार मान्य करावे लागतील, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. आमच्यासोबत यायचे असेल तर ठीक, नाहीतर आमचा मार्ग वेगळा असेल, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे महापालिका निवडणुकीआधीच युतीत तणाव वाढल्याचे दिसते. यावर आता आशिष शेलार यांच्या विधानावर अमोल मिटकरींचा पलटवार केला आहे.
याचवेळी शेलार यांनी ठाकरे बंधूंवरही टीका करत, त्यांच्या पक्षांमध्ये अंतर्गत विसंवाद असल्याचा दावा केला. दोन्ही पक्षांत गोंधळ, नाराजी आणि फुटीची स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शेलारांच्या वक्तव्याला उत्तर दिले. आमचा पक्ष शिव–शाहू–फुले–आंबेडकरांच्या विचारांवर ठाम आहे आणि तो विचार आम्ही सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या शाब्दिक चकमकीमुळे राज्यातील राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे.
अमोल मिटकरींचा पलटवार
तुम्हाला अपेक्षित विचारधारा आम्ही जरी स्वीकारत नसलो तरी आमच्या पक्षाची आंबेडकरी विचारधारा तुम्हाला नाईलाजाने का होईना स्वीकारावीच लागते हे त्रिवार सत्य आहे, आशिष शेलार यांच्या विधानावर अमोल मिटकरींचा पलटवार केला आहे.