पालघरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला आहे. त्यांची हत्या करण्यात आली आहे. अशोक धोडी हे सोमवारी 20 जानेवारीपासून बेपत्ता होते. अखेर आज १२ व्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या या प्रकरणानंतर अशोक धोडी यांच्या अपहरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. १२ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अशोक धोडी यांचा मृतदेह आढळला आहे. त्यांच्या गाडीतल्या डिकीतच त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.
दृश्यम सिनेमाप्रमाणे पाण्यातून बाहेर काढली कार
अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणामध्ये पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. यावेळी चौकशीदरम्यान पोलिसांना धोडी यांच्या गाडीची माहिती मिळाली. पोलीसांनी त्यानुसार तपासाची सूत्रे हाती घेतली. गुजरातमधील भिलाडजवळ सरिग्राम मालाफलिया येथे एका बंद दगड खाणीत त्यांची कार असल्याचे समोर आलं. त्यानुसार खाणीत शोधकार्य सुरु होतं. पाण्याची खोली जास्त असल्याने कार काढण्यामध्ये अडचणी येत होत्या. पोलिसांनी गोताखोर आणि क्रेनच्या सहाय्याने संपूर्ण कारचा शोध घेतला. आणि ही कार बाहेर काढण्यात आली. या कारच्या डिकीत अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला. दृश्यम सिनेमातील दृश्याप्रमाणेच हा प्रकार घडला.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जाणारे शिवसेना नेते तब्बल 12 दिवसांपासून बेपत्ता होते. मुंबईला कामानिमित्त जातो, असं सांगून 20 जानेवारीला घरातून बाहेर पडलेले अशोक धोडी घरी परतलेच नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांची धाकधूक वाढली आहे. अशोक धोडी यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. अखेर आज त्यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-