कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप विरुद्ध महाविकास आघाडीचे नाना काटे यांच्यात लढत होत आहे. भाजपाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप या आघाडीवर आहेत.
याच पार्श्वभूमीवर पिंपळे गुरावच्या कार्यालयाच्या परिसरात अश्विनी लक्ष्मण जगताप यांना आमदार पदाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. शुभेच्छांचे बॅनर या परिसरात लावण्यात आले आहेत.