जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे उपोषणला बसले आहेत. २५ जानेवारीपासून मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आज भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते बजरंग सोनावणे दाखल झाले आहेत. यावेळी मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
मनोज जरांगे यांनी काय केल्या मागण्या?
शिंदे समितीला मुदत वाढ का दिली नाही असा सवाल विचारत शिंदे समितीला मुदतवाढ देण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. शिंदे समितीला एका वर्षाची मुदतवाढ दिली, तर सलग नोंदी शोधायच्या आहेत. त्यावर मराठ्यांनी लक्ष ठेवायचं आहे. चार संस्थांचे गॅजेट्स घेणार होते घेतले नाही. शिंदे समितीकडील गॅझेट्स आहेत ते लागू करणार आहेत का हे मुख्यमंत्र्यांना विचारा असं जरांगे यांनी म्हटलं. तर ते कधीपर्यंत मान्य होणार? असा सवाल मनोज जरांगे यांनी सुरेश धस यांना विचारला आहे. शिंदे समितीला नोंदी शोधायला लावणार असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करावी. कुणबी आणि मराठा एकच आहेत. कुणबी म्हणजे शेतकरी, कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्या अशी मागणीही त्यांनी केली आहे. वंशावळ समिती देखील बरखास्त केली आहे. शिंदे समिती आणि वंशावळ समिती पुन्हा गठित करण्याची मागणी त्यांनी केली होती. या समिती पुर्नगठित करणार असा निरोप आला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ताबडतोब प्रमानपत्र देण्यासाठी कक्ष स्थापन केले होते ते सुरू करणार असल्याची माहिती यावेळी धस यांनी दिली आहे.
मुंबईला जावंच लागणार - जरांगे
सरसकट गुन्हे मागे घेतले नाही. गुन्हे मागे घेतो सांगत आहेत. मात्र, कधी गुन्हे मागे घेतले जातील नाहीत नाही असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं आहे. जिल्हाधिकारीही थोड्याच वेळात जरांगे यांच्या भेटीसाठी पोहोचणार असल्याची माहिती सुरेश धस यांनी दिली आहे. मुंबईला जावंच लागणार असं वक्तव्य जरांगे यांनी केलं आहे. शासन विचार करेल असं आपण लिहून घेऊ असं सुरेश धस म्हणाले. मात्र, एक-दीड वर्षे शासन विचार करतच आहे. आता आम्हाला अंमलबजावणी हवी असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.