Assam Flood team lokshahi
ताज्या बातम्या

आसाममध्ये पुराचा कहर, आतापर्यंत 56 जणांचा मृत्यू

18 लाखांहून अधिक लोक पुरग्रस्त भागात अडकल्याची माहिती

Published by : Shubham Tate

Assam Flood : आसाममध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराने कहर केला आहे. ज्यामध्ये आतापर्यंत 56 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आसाममध्ये (assam) 18 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. पुराचे (Flood) पाणी रस्त्यावर तुंबल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यासोबतच अनेक भागात दरडी कोसळल्याच्याही बातम्या आहेत. दारंग जिल्ह्यातील सिपाझार भागात राष्ट्रीय महामार्ग 15 वर पुराचे पाणी वाहत आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर दरंग जिल्हा प्रशासनाने महामार्गावरील सर्व वाहने बंद केली आहेत. (flood wreaks havoc in assam so far 56 people have died more than 18 lakh people affected)

यानंतर राष्ट्रीय महामार्गावर शेकडो ट्रक अडकून पडले आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) माहिती दिली आहे की, राज्यातील 28 जिल्हे पुरामुळे प्रभावित झाले आहेत. या जिल्ह्यांमध्ये 18.94 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गुवाहाटीच्या विविध भागात पाणी साचले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आसाममधील पूरस्थितीची माहिती घेण्यासाठी फोन केला होता.

या नैसर्गिक आपत्तीमुळे लोकांना होत असलेल्या अडचणींबद्दल चिंता व्यक्त करत पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. राज्यातील 35 जिल्ह्यांपैकी 28 जिल्ह्यांतील 2930 गावांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. शुक्रवारी पावसामुळे दोन मुलांसह आणखी नऊ जणांना जीव गमवावा लागला. येत्या 24 तासांत आणखी पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. विभागाने शनिवारी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप