ताज्या बातम्या

Maharashtra Flood : मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत, NDRF निकषांनुसार दर निश्चित

महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस झाल्याने मराठवाड्यात ऐतिहासिक पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत सरकारच्या मदतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार मदत केली जाईल अशी घोषणा सरकारकडून वेळोवेळी करण्यात आली आहे.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • मराठवाड्यात ऐतिहासिक पूर परिस्थिती

  • सरकारच्या मदतीकडे सर्वांचे लक्ष

  • एनडीआरएफच्या निकषानुसार मदत केली जाईल

महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस झाल्याने मराठवाड्यात ऐतिहासिक पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत सरकारच्या मदतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार मदत केली जाईल अशी घोषणा सरकारकडून वेळोवेळी करण्यात आली आहे. तसेच, गरज पडल्यास निकष बाजूला ठेवून मदत केली जाईल असेही जाहीर करण्यात आले होते. २७ मार्च २०२३ रोजी राज्य सरकारने शासन आदेश प्रसारित करून आपत्कालीन परिस्थितीमध्ये द्यायच्या मदतीचे दर २०२६ पर्यंत निश्चित केले आहेत.

हे दर केंद्र सरकारच्या नैसर्गिक आपत्ती निकषांवर आधारित आहेत. ५,००० ते ४७,००० रुपये प्रति हेक्टर अनुदान जमीन खरवडणे आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मिळेल. २,२०० ते १८,००० रुपये प्रति हेक्टर अनुदान शेत जमिनीवर तीन इंचापेक्षा जास्त गाळ आल्यास मिळेल. ८,५०० रुपये प्रति हेक्टर शेती पिके आणि फळ पिकांसाठी कोरडवाहू क्षेत्रात , तर १७,००० रुपये प्रति हेक्टर मदत सिंचन क्षेत्रात मिळेल. दुधाळ जनावरे दगावल्यास ३७,५०० रुपये, बैल दगावल्यास ३२,००० रुपये, वासरू, खेचर, शिंगरू, गाढव दगावल्यास २०,००० रुपये, बकरी, शेळीसाठी ४,००० रुपये आणि कोंबड्यांसाठी १०० रुपये मदत निश्चित केली आहे. घर पडल्यास १,२०,००० रुपये, डोंगरी भागातील कच्चा घर पडल्यास १,३०,००० रुपये, पक्क्या घराचे नुकसान झाल्यास ६,५०० रुपये, कच्च्या घराचे नुकसान झाल्यास ४,५०० रुपये आणि झोपडी पडल्यास ८,००० रुपये मदत मिळेल. पुरामध्ये जीवित हानी झाल्यास ४,००,००० रुपये मिळतील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune Accident : भोर-महाड मार्गावर जीवघेणा अपघात; खड्ड्यात कार कोसळून मुंबईकराचा मृत्यू

Siddhivinayak Trust : पूरग्रस्तांच्या मदतीला सिद्धिविनायकचा बाप्पा; ट्रस्टकडून 'इतक्या' कोटींची मदत जाहीर

Maharashtra Flood : मराठवाड्यात अतिवृष्टी ! तब्बल 104 जणांचा घेतला बळी

Dead Person : मृत व्यक्तीच्या तोंडात तुळशीचे पान का ठेवतात, जाणून घ्या...