Uttar Pradesh News : केसाची क्लिप आणि छोटा पॉकेट चाकू, रेल्वे स्टेशनवर महिलेची प्रसूती; नेमकं प्रकरण काय?  Uttar Pradesh News : केसाची क्लिप आणि छोटा पॉकेट चाकू, रेल्वे स्टेशनवर महिलेची प्रसूती; नेमकं प्रकरण काय?
ताज्या बातम्या

Uttar Pradesh News : केसाची क्लिप आणि छोटा पॉकेट चाकू, रेल्वे स्टेशनवर महिलेची प्रसूती; नेमकं प्रकरण काय?

झाशी रेल्वे स्थानकावर एका गर्भवती महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर तिथे तैनात लष्करी अधिकारी तत्काळ मदतीला धावले.

Published by : Riddhi Vanne

At Jhansi railway station, a pregnant woman suddenly went into labor, and an on-duty army officer immediately rushed to help her : झाशी रेल्वे स्थानकावर एका गर्भवती महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर, तेथील उपस्थित लष्करी डॉक्टरने अप्रतिम प्रसंगावधान राखत तिची यशस्वी प्रसूती करून दाखवली. उपलब्ध साधनसामुग्रीचा कमीतकमी वापर करून बाळाला सुरक्षितरित्या जन्म देण्यात आला. ही घटना पाहून उपस्थित प्रवासी आणि महिला कर्मचारी भारावून गेले.

उत्तर मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेलहून गोरखपूरला जाणाऱ्या एक्सप्रेसमधून प्रवास करत असलेल्या एका महिलेला अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्या. झाशी स्थानकावर तिची प्रकृती पाहून महिला कर्मचारी आणि तिथे तैनात लष्करी अधिकारी तत्काळ मदतीला धावले.

त्याचवेळी आर्मी मेडिकल कॉर्प्सचे मेजर डॉ. रोहित बचवाला (वय 31) आपल्या गाडीची वाट पाहत फलाटावर उपस्थित होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी त्वरित महिलेला मदतीचा हात पुढे केला. उपलब्ध साधनांमध्ये केसाची क्लिप आणि छोटा पॉकेट चाकू यांचा वापर करत त्यांनी त्या महिलेची सुरक्षित प्रसूती पार पाडली. डॉ. बचवालांनी सांगितले की, फलाटावर कोणतीही वैद्यकीय यंत्रणा नसल्यामुळे प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. तात्पुरती वैद्यकीय व्यवस्था उभारून त्यांनी प्रसूती केली. नाळ रोखण्यासाठी केस क्लिपचा आणि ती कापण्यासाठी पॉकेट चाकूचा वापर करण्यात आला.

प्रसवोत्तर महिला आणि नवजात बाळाला तातडीने रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या घटनांनंतर मेजर बचवाला नियोजित प्रवासासाठी हैदराबादकडे रवाना झाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune Police Headquarters : पुणे पोलीस मुख्यालयातील खळबळजनक घटना; 28 वर्षीय अंमलदारानं गळफास घेत संपवलं जीवन

Latest Marathi News Update live : पुण्यात एसटी थांबवून ठेवल्यानं वारकऱ्यांचा संताप

MNS Leader Video Viral : मनसे नेत्याच्या मुलाचा 'त्या अवस्थेतील' Video Viral; अभिनेत्रींला केली शिवीगाळ

RSS On Language Row : 'स्थानिक भाषेला प्राधान्य द्या'; भाषा वादावर RSS ची पहिली प्रतिक्रिया