Dhananjay Munde Dussehra Melva : दसरा मेळाव्यात धनंजय मुंडेंची शेरोशायरीतून विरोधकांवर जोरदार हल्ला Dhananjay Munde Dussehra Melva : दसरा मेळाव्यात धनंजय मुंडेंची शेरोशायरीतून विरोधकांवर जोरदार हल्ला
ताज्या बातम्या

Dhananjay Munde Dasara Melava : दसरा मेळाव्यात धनंजय मुंडेंची शेरोशायरीतून विरोधकांवर जोरदार हल्ला

भगवान भक्तीगड: धनंजय मुंडेंनी दसरा मेळाव्यात विरोधकांवर शेरोशायरीतून हल्ला

Published by : Riddhi Vanne

Dhananjay Munde Dussehra Melva : भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्यात आमदार धनंजय मुंडेंनी थेट भाष्य करत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. सुरुवातीला त्यांनी शेरो-शायरीच्या ओळी उच्चारत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. मुंडे यांनी शेरोशायरीने सुरुवात करताना म्हटले

“हर मुश्किल को हसते हसते

झेलते है हम,

अँधियों में भी चिराग जला कर

चलते है हम….”

तसेच घरातील आगीतून स्वतःच्या अस्तित्वावर बोलताना त्यांनी मित्रासोबतचा संवाद मांडला –

“घर में आग लगी है तो बचा क्या है,

मैंने कहा – मैं बचा हूँ,

तो दोस्त ने कहा – अगर तू बचा है,

तो जला क्या है?”

यानंतर मुंडेंनी आपल्या विरोधातील खटल्याचा उल्लेख करत सांगितले, “माझ्याविरोधात घोटाळा दाखल झाला. न्यायालयाने मला क्लिनचिट दिली, कोर्टात गेलेल्यांना एक लाख दंड ठोठावला. तरीदेखील मी आजही शिक्षा भोगतोय. ना मी कुणाच्या विरोधात आहे, ना कुणाविरोधात गेलो आहे.” आरक्षणाच्या प्रश्नावरही त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. “मराठा आरक्षणासाठी आम्ही लढलो. पण काही जण ओबीसींचे हक्क हिरावून घेत आहेत. एमपीएससी निकालात ओबीसी कटऑफ 485, तर विशेष मागास वर्गाचा 450 आहे. मी 450 वर प्रवेश मिळवू शकलो असतो, पण ओबीसीत 480 असूनही संधी नाही. ही खुर्ची मिळवण्याची राजकारणाची खेळी आहे.”

शेतकऱ्यांच्या संकटावर भाष्य करताना त्यांनी सांगितले, “अभूतपूर्व पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मी मंत्री नाही, पण माझी बहीण पंकजा मुंडे मंत्री आहेत. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी त्या प्रयत्नशील राहतील.” पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आल्यावर पहिल्यांदाच भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा पार पडला. त्यामुळे या मेळाव्याकडे राज्यभराचे लक्ष लागले होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा