ताज्या बातम्या

ATM मधून पैसे काढणे महागणार, बॅलन्स चेक केला तरी लागणार चार्ज; 1 मेपासून नियम बदलणार

एटीएम वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

एटीएम वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. 1 मे आतचा ATM च्या नियमांत बदल होणार आहेत. 1 मेपासून दुसऱ्या बँकेच्या एटीएम मशीनमधून पैसे काढणे, मोजणे आणि बॅलेन्स चेक करणे आता महागणार असल्याची माहिती मिळत आहे.

दुसऱ्या बँकेतील एटीएममधून पैसे काढण्यासाठी मेट्रो शहरात 5 आणि नॉन मेट्रो शहरात 3 व्यवहार मोफत दिले जात आहेत. एटीएम चार्ज वाढवल्याने एटीएम नेटवर्क ऑपरेटर आणि व्हाईट लेबल एटीएम कंपन्यांकडून इंटरचेंज फीस वाढविण्याची मागणी केली जात असल्याची माहिती मिळत आहे.

आरबीआयकडून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली असून आता दुसऱ्या बँकेच्या एटीएम मशिनमधून पैसे काढणे आता महागणार असून एटीएममधून पैसे काढल्यास 17 ऐवजी 19 रुपये चार्ज लागणार असून बॅलेन्स चेक करण्याचा करण्यासाठी 7 रुपयांवरुन 9 रुपये चार्ज लागणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी