थोडक्यात
आरएसएसच्या विचारसरणीत, कोणताही हिंदू लहान किंवा मोठा नसतो.
कोविड-19 साथीच्या काळात लोकांना मदत केली
प्रत्येक स्वयंसेवक भेदभावाविरुद्ध लढत आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्त मोदी म्हणाले, स्वातंत्र्यानंतर संघाला अनेकदा चिरडण्याचे प्रयत्न झाले पण संघ वटवृक्षासारखा खंबीरपणे उभा राहिला असं म्हटले आहे. नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित आरएसएस शताब्दी समारंभात पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी एक विशेष टपाल तिकिट आणि एक नाणे जारी केले. तसेच स्वयंसेवकांनी कोविड-19 मध्ये देशाला मदत केली असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) म्हणाले की, प्रत्येक स्वयंसेवक अस्पृश्यतेविरुद्ध लढला. आरएसएसच्या (RSS) विचारसरणीत, कोणताही हिंदू लहान किंवा मोठा नसतो. स्वयंसेवक प्रत्येक आपत्तीनंतर पुढे आले आणि कोविड-19 साथीच्या काळात लोकांना मदत केली. आरएसएसने एक विहीर, एक मंदिर आणि एक स्मशानभूमीची वकिली केली. प्रत्येक स्वयंसेवक भेदभावाविरुद्ध लढत आहे. आज महानवमी आहे. सिद्धिदात्री देवीचा दिवस आहे. मी माझ्या सर्व देशवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. उद्या विजयादशमीचा महान उत्सव आहे.” हा अन्यायावर न्यायाचा विजय, असत्यावर सत्याचा विजय, अंधारावर प्रकाशाचा विजय आहे. विजयादशमी ही भारतीय संस्कृतीच्या या विचाराची आणि श्रद्धेची कालातीत घोषणा आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
फक्त योगायोग नाही : पंतप्रधान मोदी
या कार्यक्रमात पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 100 वर्षांपूर्वी इतक्या मोठ्या उत्सवावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होणे हा योगायोग नव्हता. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेचे हे पुनरुज्जीवन होते. ज्यामध्ये राष्ट्रीय चेतना वेळोवेळी नवीन अवतारांमध्ये युगाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रकट होते. या युगात, संघ हा त्या शाश्वत राष्ट्रीय चेतनेचा सद्गुणी अवतार आहे. असेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.