ताज्या बातम्या

Mumbai Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Published by : Dhanshree Shintre

मुंबईच्या तिन्ही मार्गावर आज म्हणजेच रविवार, 07 एप्रिल रोजी उपनगरीय विभागात मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे तिन्ही मार्गावरील लोकल गाड्यांवर परिणाम होणार आहे. मेगाब्लॉकमुळे लोकलने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

मध्य रेल्वे

कुठे : माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी 10:05 ते दुपारी 3:55

परिणाम : या दरम्यान, सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या गाड्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड स्थानकांदरम्यान थांबतील आणि नंतर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर मार्ग

कुठे : ठाणे-वाशी/नेरळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर

कधी : सकाळी 11:10 ते सायंकाळी 4:10

परिणाम: या दरम्यान,ठाणे येथून वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या आणि वाशी/नेरुळ/पनवेल येथून ठाणे करीता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येईल.

पश्चिम रेल्वे

कुठे : माहिम ते अंधेरी स्थानकांदरम्यान अप-डाउन हार्बर मार्गावर

कधी : सकाळी 11:00 ते दुपारी 4:00

परिणाम: या दरम्यान सीएसएमटी-बांद्रा,गोरेगाव दरम्यानची लोकल वाहतूक पुर्णपणे बंद राहील. तसेच चर्चगेट ते गोरेगाव लोकल सेवा देखील बंद राहणार असल्याने रेल्वे विभागातर्फे कळवण्यात आले आहे.

Sanjay Raut : फक्त आमची सभा होऊ नये म्हणून प्रधानमंत्र्यांना बोलवण्यात आलं

Sanjay Raut : प्रधानमंत्री मुंबईत येऊन 25 - 30 सभा घेतात, मग तुम्ही 10 वर्ष काहीच काम केलं नाही ना

पंतप्रधान मोदी यांच्या सभेत घोषणा देणाऱ्या तरुणाने घेतली शरद पवार यांची भेट

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र; म्हणाले...

शिरूर मतदारसंघाच्या ईव्हीएम स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही 24 तास बंद