ताज्या बातम्या

Pahalgam Tourism Alive Again : 'हमको यहाँ आना है, आतंक को हराना है'; 'हा' संवेदनशील अभिनेता पोहोचला पहलगाम

पर्यटकांनी पुन्हा काश्मीरला येणे आवश्यक आहे, असे अतुल कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

Published by : Rashmi Mane

गेल्या आठवड्यात २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम या पर्यटनाच्या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये हिंदू पर्यटकांना दहशतवाद्या निर्घृणपण जीवे मारले. परिणामी, काश्मीरमध्ये असलेल्या पर्यटकांनी परतीचा मार्ग स्वीकारला. मात्र मराठी, हिंदी चित्रपटांमधून विविध भूमिका साकारणारा कलाकार अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी थेट पहलगाममध्ये जाऊन पुन्हा एकदा पहलगाम येथील पर्यटनाला नवसंजीवनी दिली आहे. भारतातील लोकांनी काश्मीरला जाणे बंद केले तर दोन वर्षांपासून सुरू झालेला आपला आणि त्यांचा संवाद पुन्हा तुटेल, यामुळेच पर्यटकांनी पुन्हा येथे येणे आवश्यक आहे, असे अतुल कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

अतुल कुलकर्णी यांनी नमूद केल्या कवितांच्या ओळी -

चलिए जी कश्मीर चलें, हमको यहाँ आना है, आतंक को हराना है

चलिए जी कश्मीर चलें

सिंधु, झेलम किनार चलें, कश्मीरियत की बात सुनें

कश्मीरियों की बात बनें, चलिए जी, कश्मीर चलें

हिंदोस्तां की ये जागीर है, के डर से हिम्मत भारी है

हिंदोस्तां की ये जागीर है, के नफ़रत प्यार से हारी है

चलिए जी कश्मीर चलें , सिंधु, झेलम किनार चलें

अतुल कुलकर्णी यांच्या या पुढाकाराचे आमदार रोहित पवार यांनी भरभरून कौतुक केले आहे. "अतुल कुलकर्णी हे एक संवेदनशील अभिनेते आहेत.. म्हणूनच ‘रिल लाईफ‘पेक्षाही त्यांचं ‘रिअल लाईफ’ मनाला खूप भावतं.. आजही त्यांनी काश्मिरमध्ये जाऊन आपल्यातील संवदेनशीलपणा दाखवून दिल्याने त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला.. देशाची एकात्मता राखण्यासाठी काश्मिरमध्ये जाण्याची त्यांची ही कृती नक्कीच कौतुकास्पद आहे," असे त्यांनी आपल्या 'एक्स' पोस्टमध्ये नमूद केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Adani Group : अदानी समूहाच्या कंपन्यांना सेबीकडून क्लीन चिट

Rohit Pawar : "कोर्टाची नोटीस मिळाल्यानंतर पाऊल उचलणार", कोकाटेंनी दिलेल्या मानहानीच्या नोटीसवर रोहित पवारांचं वक्तव्य

Gold Silver Rate : ग्राहकांची चिंता मिटली! लवकरच सोने-चांदीच्या भावात होणार मोठी घसरण; कधी ते जाणून घ्या

Chhagan Bhujbal : "अंतरवालीतील दगडफेक शरद पवारांच्या..." अंतरवालीतील दगडफेकीवर भुजबळांनी केला पडदाफाश