ताज्या बातम्या

23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करणार; मोदींची घोषणा

चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाचं जगभर कौतुक केलं जात आहे.

Published by : Siddhi Naringrekar

चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाचं जगभर कौतुक केलं जात आहे. 23 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले पंतप्रधान मोदी आज (26 ऑगस्ट रोजी) बेंगळुरुमध्ये दाखल झाले. मोहिमेत सहभागी असलेल्या इस्रोच्या टीमच्या सर्व शास्त्रज्ञांची त्यांनी भेट घेतली.

यावेळी पंतप्रधान मोदींनी सर्वांशी संवाद साधला. मोदी म्हणाले की, देशातली शास्त्रज्ञांनी अशक्य ते शक्य केलं. तुमचं कितीही कौतुक केलं तरी ते कमी आहे. इस्त्रोमुळे आज भारताचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. आजच्या भारतानं इतिहास घडवला. लॅँडर ज्या ठिकाणी उतरलं त्या ठिकाणाला आता शिवशक्ती असं नाव. 23 ऑगस्ट हा दिवस सर्वांच्या लक्षात राहणारा. मोदी म्हणाले.

तसेच मोदींनी घोषणा केली की, 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्यात येणार. 23 ऑगस्ट सतत देशवासियांना प्रेरणा देणारा. इस्त्रोने मेक इन इंडियाला चंद्रावर पोहचवलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली