Crime News Team Lokshahi
ताज्या बातम्या

औरंगाबाद हादरलं! एकतर्फी प्रेमातून भरदिवसा विद्यार्थीनीचा खून

शहरातील देवगिरी महाविद्यालय परिसरात ही घटना घडली आहे.

Published by : Team Lokshahi

औरंगाबाद | सचिन बडे : औरंगाबादेत गेल्या काही दिवसांपासून वाढत जाणाऱ्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शहरातील वेगवेगळ्या भागांत आतापर्यंत अनेक गुन्हे घडले असून, त्यातच आता शहरातील देवगिरी महाविद्यालय परिसरात भरदिवसा विद्यार्थिनीचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबाद शहरातील देवगिरी कॉलेज परिसरात ही घटना घडली असून, या घटनेमुळे सध्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून, त्यावरुन पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

एकतर्फी प्रेमातून आरोपीने विद्यार्थीनीचा हा खून केल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलं आहे. आरोपीने विद्यार्थिनीला 200 फूट ओढत नेलं, त्यानंतर तिचा चाकुने भोसकून खून केल्याचं समजतंय. विद्यार्थीनीच्या खुणामुळे औरंगाबादेत मात्र खळबळ निर्माण झाली आहे. देवगिरी महाविद्यालयाजवळचा हा परिसर नेहमीच महाविद्यालयातील तरुणांमुळे गजबजलेला असतो. मात्र अशा भागात आज झालेल्या घटनेनं पालक विद्यार्थी आणि पालकांमध्येही चिंता निर्माण झाली आहे.

नागरिकांमध्ये आता अशा घटनांमुळे संताप निर्माण झाला असून, पोलीस प्रशासन काय करतंय? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. मागच्या काही दिवसांत औरंगाबादेत हत्येचे अनेक गुन्हे घडले असून, महिलांना त्रास देण्याच्या देखील अनेक घटना समोर आलं पाहिजे. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा सवाल निर्माण झाला आहे. पोलिसांनी या घटनेच्या तपासाला सुरुवात केली असून, चार टीम आरोपीच्या शोधात सक्रिय झाल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच