Raj Thackeray Team Lokshahi
ताज्या बातम्या

"आम्हाला कुणीही अडवू शकत नाही असे म्हणत, राज ठाकरेंचा 'हा' कार्यकर्ता पोहचला अयोध्येत

सध्या राजकारण वेगवेगळ्या विषयावरुन चांगलेच तापले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

सध्या राजकारण वेगवेगळ्या विषयावरुन चांगलेच तापले आहे. मशिदीवरील भोंगा, हनुमान चालीसा (Hanuman Chalisa ) या चर्चेचा विषय ठरत आहे.

मशिदीवरील भोंग्यांच्या संदर्भात मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर ५ जून रोजी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अयोध्येत (Ayodhya) श्रीराम दर्शनासाठी जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र त्यांच्या या दौऱ्याला भाजपचे (BJP) खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh ) यांच्याकडून विरोध करण्यात आला. यानंतर प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे (Raj Thackeray) यांना अयोध्या दौरा पुढे ढकलावा लागला.

याच दरम्यान आता मनसेचे (MNS) ठाण्यातील नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) हे काही कार्यकर्त्यांसह रविवारी अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत पोहचल्यावर त्यांनी रामलल्लाचे दर्शनही घेतले आहे. जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करून ही माहिती दिली. आम्ही ठरवल्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत ती गोष्ट पूर्ण करतोच. आम्हाला कुणीही अडवू शकत नाही. बृजभूषण सिंह यांचा कार्यक्रम होत असलेल्या ठिकाणीही आम्ही गेलो होतो असे ते म्हणाले.

यासोबतच ते म्हणाले की, आव्हान स्वीकारत आम्ही थेट अयोध्येत जाऊन पोहोचलो आहोत. कोणीही मराठी माणसाला चँलेज करायचे नाही. आम्ही आलोय, आम्ही रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. आम्हाला धमक्या द्यायचे बंद करा. ज्यादिवशी राज ठाकरे आदेश देतील तेव्हा या सगळ्यांना जागा दाखवून देऊ.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा