ताज्या बातम्या

राज ठाकरेंच्या आदेशानंतर अविनाश जाधव यांचा राजीनामा मागे

राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी आपला राजीनामा मागे घेतला. ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आज तो मागे घेतला आहे.

Published by : shweta walge

मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर अविनाश जाधव यांनी हा निर्णय घेतला आहे. काल त्यांनी ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. मात्र त्यांनी आज तो मागे घेतला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मनसेच्या उमेदवारांचा पराभव झाल्याने त्यांनी राजिनामा दिल्याचे म्हटले आहे. अविनाश जाधव हे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार होते. परंतु त्यांचा देखील पराभव झाला होता.

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील तब्बल १२८ उमेदवार राज्यभरात विविध मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. मात्र, १२८ उमेदवारांपैकी एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे या निवडणुकीत मनसेला मोठा धक्का बसला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा