अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. राम मंदिराला आणि उत्तर प्रदेशातील काही जिल्हाधिकाऱ्यांना धमकीचा ईमेल आल्याची माहिती मिळत आहे. अयोध्या आणि इतर जिल्ह्यांना पाठवलेला धमकीचा मेल हा तामिळनाडूतून आला असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी अयोध्येच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. देशभरातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. याप्रकरणी सायबर सेल अधिक तपास करीत आहेत.