Ayodhya Ram Mandir Dhwajarohan  
ताज्या बातम्या

Ayodhya Ram Mandir Dhwajarohan : अयोध्येत श्रीराम मंदिरात आज ध्वजारोहण सोहळा

अयोध्येत श्रीराम मंदिरात आज ध्वजारोहण सोहळा होणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Ayodhya Ram Mandir Dhwajarohan) अयोध्येत श्रीराम मंदिरात आज ध्वजारोहण सोहळा होणार आहे. आज दुपारी ११.५५ ते १२.१० या अभिजित मुहूर्तावर पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत धर्मध्वजाची स्थापना करणार आहेत. श्रीराममंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावर ४२ फुटाचा स्तंभ बसवण्यात आला आहे.

या स्तंभावर २२ फूट लांब आणि ११ फूट रुंद असा हा ध्वज लावला जाणार आहे. दूरचित्रवाणीच्या माध्यमातून घरबसल्या या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता येणार असल्याची माहिती मिळत आहे. या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

देश-विदेशातील नामांकित मान्यवरांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून मंदिर परिसरात फुलांच्या रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत तर शहरात सर्वत्र फुलांची सजावट केली जात आहे. देश-विदेशातून भाविक या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी येणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर अयोध्येत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ध्वज उभारण्यासाठी ‘रिमोट कंट्रोल’चा वापर करण्यात येणार असून ‘ऑटोमॅटिक फ्लॅग होस्टिंग सिस्टम’, म्हणजेच स्वयंचलित ध्वजारोहण प्रणाली बसवण्यात आली आहे.

Summery

  • अयोध्येत श्रीराम मंदिरात आज ध्वजारोहण सोहळा होणार

  • श्रीराममंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावर ४२ फुटाचा स्तंभ बसवण्यात आला

  • दूरचित्रवाणीच्या माध्यमातून घरबसल्या या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता येणार

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा