ताज्या बातम्या

Ayodhya Ram Mandir Inauguration : राम मंदिराच्या उद्घाटनाला अयोध्येत बॉलिवूडचे सेलिब्रिटी उपस्थित

अयोध्येत राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अयोध्येत राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. आज होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येसह संपूर्ण देशभर रामभक्तीचे वातावरण आहे. अयोध्येतील घराघरांवर भगवे ध्वज उभारण्यात आले आहेत. सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली आहे.

याच पार्श्वभूमीवर राजकीय आणि उद्योगपती मंडळींसह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. देशभरात प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा जल्लोष पाहायला मिळत आहे.

सकाळी 10.55 वा. पंतप्रधानांचे राम जन्मभूमी परिसरात आगमन होईल. दुपारी 12.15 ते 12.45 वाजेपर्यंत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. प्राणप्रतिष्ठेचा शुभमूहूर्त 12.29.08 ते 12.30.32 आहे. मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसेच मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. निमंत्रित पाहुण्यांची मंदिरात येण्यासाठी सुरुवात झाली आहे. राममंदिर सोहळ्यासाठी अयोध्येत कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. यासाठी 10 हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह ड्रोनची नजर असणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...