AAP  Team Lokshahi
ताज्या बातम्या

भोंग्यांच्या वादात आम आदमीची उडी; चौका-चौकात वाजणार...

राज्यात सध्या भोंगे विरुद्ध हनुमान चालिसा हा वाद निर्माण झाला आहे.

Published by : Sudhir Kakde

राज्यात सुरु असलेल्या भोंगा विरुद्ध हनुमान चालिसा या वादात आता आम आदमी पक्षानेही उडी घेतली आहे. महागाईने होरपळलेल्या आणि जगण्याचे प्रश्न निर्माण झालेल्या समाजात आपापसात फूट पाडून त्यांना महत्वाच्या प्रश्नांपासून दूर करण्याची भाजपासह इतर राजकीय पक्षांच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो असं आपने म्हटलं आहे. त्यामुळे सर्व जाती-धर्मांना एकत्र आणून राष्ट्रीय सलोखा निर्माण करण्यासाठी आपकडून चौकाचौकात राष्ट्रगीत वाजवले जाणार आहे. ही माहिती आपचे प्रदेश सचिव धनंजय शिंदे यानी दिली.

आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे यांनी महागाईला केंद्र व राज्य सरकार जवाबदार असल्याचेही आरोप केले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भोंगा व हनुमान चालीसा राजकारणाबाबत बोलताना शिंदे यांनी ऑगस्ट 2016 मध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशात कोणत्याही एका धर्माबद्दल न बोलता सर्व धार्मिक स्थळावरील ध्वनिक्षेपकाच्या आवाजाला 75 डेसीबलची मर्यादा घालून दिली आहे. मात्र मनसे बेरोजगार तरुणांचा बुद्धिभेद करत आहे असा आरोप केला. तसंच ग्रामीण भागात मंदिरात सकाळी आरतीसाठी भोंगे लावले जातातच असंही सांगितलं. महागाईने होरपळलेल्या आणि जगण्याचे प्रश्न निर्माण झालेल्या समाजात आपापसात फूट पाडुन त्यांना जगण्याच्या प्रश्नांपासून दूर करण्याच्या भाजपासह इतर राजकीय पक्षाच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो असंही ते पुढे म्हणाले.

सर्वच भोंग्यांचा निषेध करत सर्व जाती धर्मांना एकत्र आणून राष्ट्रीय सलोखा निर्माण करणारे राष्ट्रगीत आप कडून चौकाचौकात वाजवले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यकर्त्यांना केलेल्या मार्गदर्शन पर भाषणात धनंजय शिंदे यांनी पेरोल वर सुटलेल्या पप्पू कलानी सोबत दोन कॅबिनेट मंत्री फोटो काढतात सोशल मीडियावर फोटो व्हायरल करतात, ठाणे जिल्ह्याची लूट ठाण्याच्या बंटी-बबलीने केल्याचा आरोप करत पालक मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर थेट टीका केली.

दरम्यान, कल्याण डोंबिवलीत आपच्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज शिंदे कल्याण मध्ये आले होते. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या वतीने पक्ष बळकटीकरणासाठी आज कल्याणमध्ये कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे प्रभारी दीपक सिंगल, गोव्याचे माजी उद्योगमंत्री महादेव नाईक, प्रदेश सचिव धनंजय शिंदे यांनी कार्यकर्त्याना मार्गदर्शन केलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Raut : मुंबईत आज साजरा होणार ‘मराठी विजय दिन’; संजय राऊतांनी सांगितली कार्यक्रमाची रुपरेषा

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांचीही हजेरी

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून